पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण बारावे. १६३ यास चार पुत्र, वडील मोरोपंत हे नुकतेच वारले. ते रेव्हेन्यु खात्यांत नोकर होते. त्यांचे वडील चिरंजीव दामोदर पुणे येथे पोस्टांत नोकर . आहेत. अनंतराव शिवराम हे सातारा जिल्ह्यांत इंजिनीयर खात्यांत ओव्हरसियर आहेत. विश्वनाथ शिवराम हे रेव्हेन्यू खात्यांत नोकर आहेत. दत्तात्रय शिवराम हे नासिक जिल्ह्यांत सबरजिष्टरचे कामावर आहेत. | माधवराव कृष्ण यांचे द्वितीय चिरंजीव त्र्यंबकराव यास तीन पुत्र माधवराव रामराव व बळवंतराव. माधवराव (भाऊसाहेब ) हे हल्लीचे सचिवाचे आजे ज्या घराण्यांतून दत्तक आले, त्या रामजी काशी गांडेकर यांचेकडे भोर येथे खाजगी कारभारी होते. तेथे ते बरीच इष्टेट व नांवलौकिक संपादून स्थाईक झाले. यास एक पुत्र गहिनीनाथ या नांवाचे आहेत; ते बी. ए. एल्एल्. बी. असून सांप्रत भोर येथे वकिली करीत आहेत. पानसे घराण्यांत हेच पहिले बी. ए. एल एल्. बी. होत. यांची वकिली चांगल्याप्रकारे चालली असून संस्थान-दरबारांत व समाजामध्ये त्यांचे वजन चांगले आहे. रामराव त्र्यंबक ( आबासाहेब ) हेही भोर स्टेटमध्ये नोकर होते. मामलतदारी व मुनसफी या दोन्ही हुद्यांची कामे त्यांनी केली. यांची शरीरसंपात्तै उत्कृष्ट होती यांन वासुदेव नांवाचा मुलगा होता. तो वकिलीचे परीक्षेत पास होऊन सासवड को वकिली करीत असे. परंतु दुर्दैवाने त्यास अकालींच मृत्यूने गांठिले. तिसरे बंध बलवंतराव ( बाबासाहेब ) त्र्यंबक हे सोनोरीस राहून जहागिरीची देखरेख करीत असत. यांस वैद्यकीचा फार नाद होता, त्यांतच त्यांनी आपले डोके चालवून व जुने ग्रंथ वाचून चांगले प्रावीण्य मिळविले होते. त्यांनी वैद्यकीचा धंदा करणाच्या चांगल्या चांगल्या पारंगत लोकांस आपले गुणामुळे थक्क करून सोडले होते. गांवांत अंत्यजांपासून . उच्च वर्गापर्यंत कोणी आजारी झाल्यास त्याचे घरीं, त्याचे आजाराचे मानाने एक दोन वेळ व कधी कधी तीन वेळ जाऊन ते औषध व पथ्य पाण्याची व्यवस्था करीत असत. यांनी वैद्यक्रियेबद्दल कधीही पैसा घेतला नाहीं; इतकेच नव्हे तर मात्रा, भस्में यासारखी किंमतवान औषधे जवळ ठेवून सर्वांस मोफत देण्याचा परिपाठ होता. गांवांत परका मनुष्य आल्यास त्याची विचारपूस व त्याची सोय या गोष्टीत त्यांनी हलगर्जीपणा कधीच केला नाही. आसपास परगांवच रोगीही त्यांचेकडे नेहमी येत असत. यांची वृत्ति सात्विक असून साधुसंताकडे यांचा ओढा फार होता. बेलापूरचे स्वामी विद्यानंद यांस सोनोरीस आणून त्यांचे सान्निध्याने राहाण्याचा योग यांनी पुष्कळ वेळां आणिला होता. हे चांगले कवि होते. यांनी प्रसंगानसार कां: पद केली आहेत. ती साधीं, भक्तिपर व प्रासादिक आहेत. यावरील गुणांमुळे सभोंवतालच्या १०।१५ खेड्यांतील समाजावर यांचे चांगले वजन असे. यांस चार पुत्र । जाहले. वडील दिगंबर हे मॅट्रिक होऊन रेलवेकडे नोकरी करीत असतां मृत्यूनें,