पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ पानसे घराण्याचा इतिहास. । ३ माणको विसाजी-यास शिवाजी, लक्ष्मण ऊर्फ शिवदेव, शामजी, सखाजी, अनंत, संभाजी, संक्राजा आणि साबाजी असे सात पुत्र झाले. | शिवाजी यांच्या वंशाचा विस्तार पानगांवी झाला. हेच शिवाजी, शाहुमहाराज दिल्लीत औरंगजेबाचे कैदेत असता, त्यांच्याजवळ त्यांचे सेवेत होते. यास खंड या नांवाचा मुलगा होता. हाच शिवसुत काव्याचा कर्ता होय. यास संतति न झाल्यामुळे त्यांनी शके १७१८ आधिक आश्विन व॥१३ गुरुवारी दत्तक घेतला व त्याचे नांव शिवाजी असे ठेविलें. या शिवाजीचा नातू खंडोपंत यास कृष्णराव, शिवराव व मैराळ असे तीन पुत्र झाले. ते पुढे विभक्त होऊन तिघांनी राहण्यास पानगांव येथे निरनिराळे तीन वाडे बांधले. याच तीन वाड्यांत सांप्रत पानशांचा वंश नांदत आहे. ते सर्व पुरुष आपल्या वडिलार्जित इष्टेटीची व्यवस्था पाहत आहेत. - लक्ष्मण ऊर्फ शिवदेव यास माधवराव, यशवंतराव, महिपतराव, राम: चंद्रराव व केशवराव असे पांच पुत्र झाले. वडील पुत्र माधवराव यास संतति झाली नाही म्हणून त्यांनी दत्तक घेऊन त्याचे नांव कृष्णराव असें ठेविलें. कृष्णरावास माधवराव व श्रीपतराव असे दोन पुत्र होते. माधवराव हे पेशवाईअखेरचे धामधुमीत महाराष्ट्रांत राहाणे हितकर नाही म्हणून काशीक्षेत्रांत जाऊन राहिले व तेथेच त्यांचा इ. स. १८२० साली अंत जाहला. माधवरावास कृष्णव त्र्यंबकराव व दामोदराव अस तीन पुत्र झाले. कृष्णराव माधव यास तीन पुत्र होते. बापूराव, नारायणराव व गजाननराव हे ते होत. पेशवाईअखेर पानशांच्या सरंजामाचे उत्पन्न ब्रिटिश सरकारनी जप्त करून त्याऐवजी पोलिटिकल पेनशन दिले. ते वरील तिन्ही भावांचे हयातीपर्यंत चालू होते. बापूराव कृष्ण यांचे बंधु नारायणराव यास गोपाळराव जयवंत यांचे मांडीवर दत्तक दिले. कनिष्ठ बंधु गजाननराव यास संतति न झाल्यामुळे त्यांनी गोविंदराव बापूराव यांचे पुत्र वामनराव यास दत्तक घेतले. हे वामनराव हल्लीं सोनवरीस राहतात. बापूराव कृष्ण यांचे नांव सरदारपटांत तिसरे क्लासांत दाखल होते. वापूराव यास सहा पुत्र झाले. केशवराव, गोविंदराव, बाळकृष्णराव, शिवराम, शंकरराव व गंगाधरराव. बापूरावाचे मागे त्यांचे वडील पुत्र केशवराव यांचे नांव सरदारपटांत दाखल होते, त्यांचे पश्चात् त्यांचे जागीं त्यांचे बंधु गोविंदराव यांचे नांव दाखल झाले. गोविंदराव नुकतेच वारले. सरदारपटांत त्यांचे पश्चात् अद्याप कोणाचेही नांव दाखल झालें नाहीं. गोविंदरावाचे पुत्र रामराव हे हल्लीं इनकम टैक्स ऑफिसमध्ये नोकर आहेत. त्यांनी आपले नांव सरदार-पटांत दाखल होण्याचा प्रयत्न करावा. बाळकृष्ण बापूराव यास दोन पुत्र झाले. वडील उमाकांत यांनी मरेपर्यंत कडकडीत ब्रह्मचर्यव्रत आचरिले. दुसरे चिंतामण बाळकृष्ण, हे हल्लीं पूर्वखानदेशांत जळगांवीं एक्झिक्युटिव्ह इंजिनीयरचे आफिसांत हेडक्लार्क आहेत. शिवराम बापूराव