पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण बारावे. १६१ इष्टेटीवर हि या व्यसनाचा परिणाम झाला. ते आज हयात असून त्यांचे चिरंजीव यशवंत हे हल्लीं पुण्यांत दिवाणी कोर्टात कारकुनाचे काम करीत असतात. गणेश विठ्ठलांचे द्वितीय चिरंजीव भगवंत हे होत. यांचे वडील पुत्र वामनराव होत. वामनरावास भालचंद्र या नांवाचे मुलगे असून ते हल्लीं टाटा हायड्रो इलेक्ट्रिक कंपनीत नोकर आहेत. कनिष्ट नागेश हे कुलाबा जिल्ह्यांत लोकलबोर्डमध्ये ओव्हरसियरचे काम करतात. खंडेराव गणेश यांचे लग्न न झाल्यामुळे यांचा जन्म अविवाहित स्थितींत गेला. यास पोहण्याचा व पाण्यात बुडी मारण्याचा फार नाद होता. त्यांतच त्यांनी प्रावीण्य मिळविले होते. यांचे या कामांतील प्रयोग गांवांत नेहमी होत असत. यांनी एक वेळ पाण्यात बुडी मारली म्हणजे वरचे पाणी स्थिर झाल्यानंतर बराच वेळपर्यंत हे वर येत नसत. प्रेक्षकांची मनें, हे कोठे विहीरीच्या कपारीत अडकून राहिले की काय या शंकेनें अस्थिर होत असत. नंतर हळूच एका कोप-यांत आपले डोळे पाण्यांतून वर काढतांना हे दिसत. यांचे पोहण्यांतील कौशल्य पाहिलेले बरेच लोक अद्यापि सोनोरी गांवीं हयात आहेत. सर्वांत कनिष्ठ पुत्र सखाराम गणेश यास तीन पुत्र झाले. गोविंद, लक्ष्मण व दिनकर. गोविंद हे पुण्यांत सिटीम्युनिसिपालिटीत नोकर आहेत. लक्ष्मण यांस त्यांचे चुलते गोपाळराव यांचे मांडीवर दत्तक दिले होते परंतु पुढे ते मयत झाले. २ मोरो विसाजी--यांचे नातु केशवबाबा हे परम ईश्वरभक्त होते. यांचे नांव संतनामावळींत आले आहे. खंडोपंतांनी ' शिवसुत' नांव धारण करून स्फुट काव्ये केली आहेत, त्यांपैकी उपलब्ध असलेला भाग आम्हीं नुकताच प्रकाशित केला आहे. या काव्यांत त्यांनी ज्या केशवबाबास गुरुस्थानी मानून वंदन केले तेच हे होत. केशवबाबास तीन पुत्र झाले. पैकी दोघांचा वंश नष्ट झाला. मधील चिरंजीव वासदेव, यास मेरो व भगवंत असे दोन पुत्र झाले. मोरोपंताचे पुत्र गेविंद हे होत. ल्यांस वासुदेव व कृष्ण असे दोन मुलगे होते. कृष्ण यास बाळाजी व राघोपंत हे मुलगे होते. बाळाजीस केशव व दाजिबा हे पुत्र झाले. केशव यांचे नात भगवान गुंडे हल्लीं बार्शी येथे लोकमान्य मिल मध्ये कॅशर आहेत. तेथेच त्यांनी घरदार करून कायमची वस्ति केली आहे. दाजिबा यास पानगांव येथील पानसे घराण्यांत दत्तक दिले. भगवंत वासुदेव यांचा वडील पुत्र नारायण यांचा वंश हल्ली कोठे आहे याचा तपास लागत नाही. सर्वात धाकटे केशवराव नारायण होत. यांस देवराव आणि देवरावास रंगोपंत व गंगाधर असे दोन पुत्र झाले. रंगोपंतांचे पुत्र बळवंतराव हे हल्लीं सोलापूर जिल्ह्यांत माळशिरस तालुक्यांत मिरगव्हाण गांवीं तलाठ्याचे काम करीत आहेत. तेथेच त्यांनी घर बांधून व कांहीं जमन जुमला खरेदी करून कायम वस्ति केली आहे. ११