पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७९ प्रकरण बारावे. सोसायटीचे ऑर्गनायझर होते. मोठ्या मेहनतीने यांनी पुष्कळ नवीन सोसायटया स्थापन केल्या. यांचे समाजावर चांगले वजन होते. हे ब्राह्मणवर्गातील पुढारी म्हणून सत्यशोधकी लोकांचे डोळ्यति खुपू लागले. पुढे त्याचे पर्यवसान यांचेवर खुनाचा आरोप येऊन न्यायासनासमोर यांना आरोपी म्हणून उभे राहण्याचा प्रसग आला. ** सत्यमेव जयते । ” या न्यायाने पुढे हे निर्दोषी होऊन सुटले. पुढे हे औरंगाबादेस कांहीं कारणानिमित्त गेले असतां शके १८४९ साली आपले वयाचे ६८ वे वर्षी वारले. यांस रंगराव, माधवराव, व त्र्यंबकराव अशी तीन अपत्ये झाली, रंगराव हे कुंडुवाडी स्टेशनवर हल्लीं कोचिंग क्लार्क आहेत व त्र्यंबकराव कन्नड तालुक्यांत मेझरिंग इन्स्पेक्टर आहेत. । ४. विसाजी परशराम यांचा वंश. विसाजी यास १ त्र्यंबक, ३ मोरो, ३ माणके, ४ गोविंद व ५ उद्भव असे पांच पुत्र झाले. १ वडील पुत्र त्र्यंबक यांस संतति झाली नाही, म्हणून त्यांनी दत्तक घेऊन त्याचे नांव शामजी असे ठेविलें. शामजीस जगजीवन व जगजीवनास शामजी व मल्हारी असे दोन पुत्र होते. शामजी जगजीवन यास आन्या म्हणत. मल्हारी हे मलबा या नांवानें प्रसिद्ध झाले. हे शूर, लढवय्ये वे मोठे मुत्सद्दी होते. हे पेशव्यांचे सन्निध नेहमीं असत व पेशवे यांची सल्लामसलत घेत असत. यांनी बरेच वेळां पेशवाईत सैन्य घेऊन शत्रूशी सामना देऊन मर्दुमकीची कामे केली आहेत; यांची वर्णने प्रसंगानुरोधाने मार्गे आलेली आहेत. यांनी सोनोरीस राहण्यासाठी एक वाडा बांधला. तो हल्ली अन्याचा वाडा या नावाने प्रसिद्ध आहे. अन्याचे नातू मल्हारपंत यास भगवंत व विनायक ही दोन मुले झाली. भगवंत हे बडोदें संस्थानमध्ये मोठ्या हुद्यावर नोकर होते. तेथे त्यांनी बरीच संपत्ति मिळविली व ते आपल्या वृद्धापकाळीं मातभ सोनोरी येथे येऊन राहिले. तेथेच त्यांचा अंत झाला. त्यांस दत्तात्रय, अन्न रघुनाथ असे तीन पुत्र होते. दत्तात्रय ऊर्फ सोनोपंत हे हयात असून त्यांचा एकलता एक मुलगा श्रीकृष्ण गेल्या सालीं मॅट्रिकचे परीक्षेत पास झाला आहे. दुसरे अनंत ( तान्होपंत ) हे पुण्यास राहात असून सावकारी लिहिणे, टिपणे वगैरे का करतात. तिसरे रघुनाथ हे मयत असून त्यांचे चिरंजीव शंभोराव रेल्वेकडे मुंबईस नोकर आहेत. विनायक मल्हार यांचा वंश हल्ली कोठे नांदत आहे त्याबद्दल माहिती मिळत नाहीं. जगजीवन यांचे दुसरे पुत्र मल्हारी, यास विठ्ठल व विठ्ठल यास शामराव, गणेश व दाजी असे तीन पुत्र झाले. शामरावास आत्माराम व पांडुरंग असे पुत्र झाले. आत्मारामास केशव व नारायण हे पुत्र झाले. केशवराव यांचे लग्न पांडुरंग शामराव भडभडे यांचे कन्येशीं झालें. भडभडे यांस पुत्रसंतति नव्हती, एकच कन्या