पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० पानसे घराण्याचा इतिहास. होती, सबब त्यांनी आपले घर ( बुधवार पेठ घ. नं. २४ ) व इस्टेट जांर्वइ यांस आंदण दिली. पांडुरंगपंत भडभडे हे वारकरी सांप्रदायिक होते. त्यांनी आपले घरी श्री. विठ्ठलाची मूर्ति स्थापन केली आहे. पुण्यास वारकरी सांप्रदायांत जी प्रमुख मंडळी होती त्यांत हे एक होते. यानंतर केशवराव यांनी सोनोरीचे वडिलोपार्जित उत्पन्नावरचा आपला हक्क सोडून दिला व ते पुण्यास येऊन राहिले. यास विठ्ठल या नांवाचा पुत्र झाला. विठ्ठल याचे लक्ष लहानपणापासून शरीरसंपत्ति वाढविण्याकडे होते. पुण्यांतील शाळेमध्ये अगदी सुरुवातीस जो मिलिटरी सिस्टिमवर ड्रिल-क्लास सुरू झाला त्यांत यांनी अग्रभागी राहून विग्युलरचे काम केले. यांचे शिक्षण फरग्युसन कॉलेजमध्ये झाले. हे इ. स. १९१३ त B. A , १९१५ M. A. व १९२१ सालीं S. T. C. D. चे. परीक्षेत पास झाले, पानसे घराण्यांतील हे पहिलेच M. A. S. T. C. D. होत. हल्ली हे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन पुणे येथे शिक्षकाचे काम करीत आहेत. गतवर्षी मुंबई सरकारने शरीरशिक्षणाचे बाबतीत सुधारणा करण्याकरितां कमेटी नेमली होती त्या कमेटीवर सेक्रेटरी म्हणून यांची नेमणूक झाली होती. नारायण आत्माराम यास मोरेश्वर या नांवाचा मुलगा होता. त्यास हेरंब, रामचंद्र व दामोदर अशी तीन मुले झाली, तीं आज हयात आहेत. हेरंब हे पुणे येथे म्युनिसिपल स्कूलमध्ये मास्तर आहेत व रामचंद्र हे दवाखान्यांत कंपाऊंडरचे काम करीत आहेत. | शामरावाचे दुसरे पुत्र पांडुरंग है सावकारी करीत असत. सोनोरी गांवापासून दोन मैलांवर असलेल्या भवानी देवीचे नित्य नियमाने दर्शन घेण्याचा क्रम यांनी आपल्या हयातीपर्यंत कोणत्याहि अडचणीस न जुमानतां सिद्धीस नेला. यांस पुत्र तीन, विष्णु, वासुदेव व कृष्णाजी. विष्णु हे सवरजिष्टर होते. नोकरी पूर्ण करून त्यांनी पेनशन घेतले होते. हे नुकतेच मरण पावले. यास पुत्र तीन विनायक, नरहरि व प्रल्हाद. पैकी विनायक हे रेव्हेन्युखात्यांत नोकर आहेत. वासुदेव यांचे पुत्र शंकर हे इंजिनीयर खात्यांत मिस्त्री आहेत. कृष्णाजी पांडुरंग हे पुणे येथे श्री शिवाजी मराठा हायस्कूल या संस्थेमध्ये शिक्षक आहेत. गणेश विठ्ठल यास धोंडोपंत, भगवत, गोपाळ, खंडेराव व सखाराम असे पांच पुत्र झाले. वडील पुत्र धोंडोपंत यांनी सुमारे चाळीस वर्षे सोनोरी गांवचें कुळकरण केले. हे फार हुशार व धाडशी असून त्याकाळी पुरंदर तालुक्यांतील सर्व कुळकर्णी लोकांत प्रसिद्ध होते. यांस पुत्र न झाल्यामुळे यांचे मार्गे यांचे विधवेने यांचा पुतण्या मार्तड यास दत्तक घेतले. मार्तड हे पुणे येथील प्रसिद्ध नगरकर वकील यांचेकडे कारकून होते. तेथे नोकर असतांना त्यास रेसेसचा नाद लागला. रेसेसमध्ये यांनी हजारों रुपये मिळविले. जुगारांत बहुधा कोणीच श्रीमंत होत नाही, या न्यायाने मिळविलेले सर्व यांनी घालविलें. इतकेच नाही, तर वडिलोपार्जित