पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ पानसे घराण्याचा इतिहास. महालकरी हा मुख्य अधिकारी असे. ही दोन्ही मुलें मधुकरी मागत असतां तेथील महालकरी यांनी त्यांची हुशारी व चलाखपणा पाहून त्यांची चौकशी केली व आपले घरीच त्यांना ठेवून घेतले. यामुळे चरितार्थाची त्यांस पुढे काळजी राहिली नाहीं. पुढे दोघांची लग्नं हि महालकरी यांनीच करून दिली. महालक-याची नोकरी त्यावेळी वंशपरंपरेने चालणारी होती. त्या महालक-यास पुत्रसंतति नसल्यामुळे त्यांनी वृद्धपणीं आपली जागा राघोबास दिली. राघोबा महालक-याचे काम करीत असतां त्यांचा अकालीं अंत झाला. राघोबा वारल्यानंतर रामराव यांचा सर्वस्वी आधार तुटला म्हणून ते आपले सर्व कुटुंब बरोबर घेऊन आपले सासुरवाडीस गेले व मेहुण्याचे ओळखीनें बीड जिल्ह्यांत नगदी कारकुनाची नोकरी त्यांनी मिळविली. यास विष्णुपंत, ( दाजीसाहेब ) शंकरराव, कृष्णराव व व्यंकटराव असे चार पुत्र झाले. विष्णुपंत यांनी मोगलाईत चोवीस वर्षे तहशील कचेरीत चिटणिशीचे काम केले; पुढे त्यांची हुशारी पाहून नबाब वजिरोवला यांचे जहागिरीवर त्यांची नेमणूक झाली. तेथून पुढे राजा दुर्गाप्रसाद यांचे जहागिरीवर नायब महालक-याची जागा यांना मिळाली. आयुष्याच्या उतारवयांत यांनी नोकरीची यातायात कमी करून सोलापूर जिल्ह्यांतील माढे तालुक्यांत म्हैसगांवीं येऊन कायमचे वास्तव्य केले. हे शके १७४० त वारले. यांस रघुनाथ या नांवाचा मुलगा आहे. हे माझलगांव जिल्हा बीड येथे जमाबंदी कारकून आहेत. यास पुत्र नारायणराव हे फर्गुसन कॉलेजमध्ये B. A. क्लासमध्ये आहेत. द्वितीय पुत्र शंकरराव यांनी तहशील कचेरीत पंधरा वर्षे नोकरी केल्यावर त्यांची नेमणूक बशरूद्दालाचे इलाख्यांत पोलीस सबइन्स्पेक्टरचे कामावर झाली. तेथेच त्यांनी पेनशन घेतले. हे शके १८३९त वारले. यांस तीन मुलें देवीदास भवानराव व दुर्गादास. देवीदास हे हल्ली मोमिताबाद येथे फारेष्ट सबइन्स्पेक्टरेच हुद्यावर आहेत. दुर्गादास यांचे वय हल्ली १७ वर्षांचे आहे. यांना लहानवयांतच उपरति झाल्यामुळे यांनी सर्वसंगपरित्याग करून हे हल्ली चारवर्षांपासून औरंगाबादेस अमृतेश्वराचे देवालयांत अयाचित् वृत्तीने राहून व गायत्री पुरश्चरणाचे अनुष्ठान करीत आहेत. - रामरावाचे तृतीय पुत्र कृष्णराव हे पहिल्याने मोंगलाईत नगदी कारकून होते. पुढे वकिलीचा अभ्यास करून त्या परीक्षेत पास झाल्यावर ते हैदराबाद व चिटगेापा येथे वकिला करू लागले. वकिलींत यांनी चांगला नांवलौकिक मिळविला. हे शके १८४० सालीं वारले. यांची संतती चांचली नाही, म्हणून आपला पुतण्या त्र्यंबक यास यांनी दत्तक घेतले. त्र्यंबकराव रामराव हे पहिल्याने औरंगाबाद म्युनिसिपालिटींत कारकुनीचे कामावर लागले. ते पायगा इलाख्यांत, राजा दर्गाप्रसाद यांचे जहागिरीवर नायब दिवाण झाले, व या ठिकाणी त्यांनी वीस वर्षे नोकरी केली. या नोकरीवर असतांना त्यांनी मट्यारपल्ली शे बरीच जमीन खरेदी केली नंतर उतारवयांत म्हैसगांवीं येऊन राहिले, म्हैसगांव यांनी पुष्कळ जमीन-जुमला मिळविला व तेथेच घर बांधून ते स्थाईक झाले. हे कोआपरेटिव्ह