पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण बारावे. १५७ सावळारामपंत पुत्र झाले. सावळारामपंत हे आपले वयाचे नववे वर्षीच पितृसुखास आंचवले; यामुळे यांच्या शिक्षणाचा सर्वस्वी भार यांच्या मातोश्रीवर पडला. ती आपल्या मुलास घेऊन पुण्यास येऊन राहिली. आपल्या पूर्वजांच्या राहिलेल्या तुटपुंज्या उत्पन्नांत ( वर्षास सुमारे शेंदीडशे रु. ) मोठ्या कष्टानें व एक वेळ उपाशी राहून मुलास शिक्षण देण्याचे पवित्र काम ती करू लागली. सावळारामपंतास त्यांच्या अल्प वयांतच या हलाखीच्या स्थितीची जाणीव झाली. म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षण मॅट्रिकपर्यंत घेतल्यानंतर ते इंजिनियर कालेजांत सबओव्हरसयिर क्लासांत गेले. त्यांत यशस्वी होऊन पुढे ते सरकारी नोकरीत शिरले. मोठ्या मेहनतीने, नेटाने व कष्टांनी यांनी काम करून नोकरीत यश संपादन केले. कल्याण-भिवंडी रस्त्यावरील मोठा लेखंडी पूल, पुणे, जुन्नर रस्त्यावरील काळंबचा पूल, पुणे सोलापूर रस्त्यावरील डाळजचा पूल आणि पुणे व भांबुरडे यास जोडणारा मुठा नदीवरील लाइड ब्रिज ( शैकसल्ला पूल ) हे यांचे देखरेखीखालीच पूर्ण झाले. पुलांवर लाविलेल्या शिलालेखांत यांचे नांव वाचकांस आढळून येईल व त्यावरून यांचे कर्तबगारीची कल्पना सहज करता येईल. वरील पुलाशिवाय पुणे येथे लक्ष्मीरोडवर नवीन बांधलेले सिटी पोस्टऑफिस व भांबुरडे येथील कोर्टाच्या इमारती, या इंग्रजी अमदानींत आजपर्यंत पुण्यास बांधलेल्या सरकारी इमारतींत ब-याच उच्च दर्जाच्या असून त्या सावळारामपंत यांच्याच देखरेखीखालीं बांधल्या गेल्या आहेत. हे. इ. स. १९१४ सालीं ओव्हरसीयर झाले व इ. स. १९२६ साली असिस्टंट इंजिनियर झाले. हे नुकतेच वारले. त्यांनी पुणे येथे रास्ता पेठेत स्वतांचे राहणेसाठीं घर न. २४२ बांधले आहे. हे फार पापभीरु असून मित्रांचे चाहते होते. यांची इच्छा प्रत्येकाच्या उपयोगी पडावे अशी होती. स्वतां झीज सोसून ते निरलसपणे लोकांच्या उपयोगी पडत असत. यां य. जांत यामुळे चांगले वजन होते. वासुदेव माधव यास वासुदेव घमेंडी या नांवाने लोक ओळखीत होते. यांनी आप आयुष्याच्या उत्तरार्धात चतुर्थाश्रम धारण केला होता. यास पांच पुत्र. हरी, बळ. वंत, विठ्ठल, त्र्यंबक व केशव असे होते. विठ्ठल हे बडोद्यास अप्पासाहेब रोडे यांचेकडे खासगी कारभारी होते. केशवराव हे सोनोरीस राहात असत. यास यशचन व भास्कर असे दोन पुत्र झाले. यशवंत हे कुलाबा जिल्ह्यांत रेंजफारेस्ट ऑफिसर आहेत. भास्कर हे वडिलार्जित इस्टेटीची देखरेख करीत असतात. राघोबा व रामराव हे मोरो नीळकंठ यांचे कनिष्ठ पुत्र होत. हे आपल्या वयाच्या अनुक्रमे १८ व १३ या वर्षी घरांतील माणसांशीं न पटल्यामुळे स्वतःचे पायावर उभे राहून स्वावलंबनाने कर्तबगारी करून पुढे यावे या हेतूने सोनोरी गांव सोलन फिरत फिरत वैराग येथे गेले. मधुकरी मागून तेथे हे आपला चरितार्थ चालवीत असत. वैराग हा गांव पेट्याचा असल्यामुळे तेथे मराठीराज्यांत या काळ