पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ पानसे घराण्याचा इतिहास. होते. गजोबाचे कनिष्ठ चिरंजीव नारायण हे ट्रेनिंग कॉलेजांत दुसरे वर्षाचे परीक्षेत पास होऊन पुणे जिल्ह्यांत लोकल बोर्ड मराठी शाळेत हेडमास्तरचे काम करीत होते. नोकरीत असतांना त्यांचा अंत झाला. यांस महिपत या नांवाचे एक मुलगे असून ते हल्लीं नाशिक जिल्ह्यांत रेव्हेन्यु खात्यांत सरकल इन्स्पेक्टर आहेत. निळी विठ्ठल यांनच सोनोरी येथील प्रसिद्ध असलेले मुरलीधराचे देवालय बांधिले. यास सदोबा, आनंदराव, राघोबा, मोरोपंत व रामाजी अशीं पांच अपत्यें झाली. सदोबा हे पुण्यांत मराठे शाहींत तोफखान्याकडे नोकर होते. हे पानपतच्या लढाईत गेले असतां गोळी लागून तेथेच त्यांचा अंत झाला. रणांगणीं मृत्यु आल्यास साधुपुरुषाप्रमाणे त्यास सद्गति मिळते असे शास्त्रवचन आहे. सबब दररोज अर्ध्या भाकरीचा नैवेद्य सदोबास समर्पण करण्याची वहिवाट या घराण्याचे वंशांत,असून ती अद्याप नियमाने पाळली जात आहे. राघोबा निळकंठ यास विष्णोपंत, तुकोपंत व श्रीपती अशी तीन मुले झाली, पैकी विष्णुपंत यांचा वंशवृक्ष पुढे चालू राहिला. विष्णुपंतास दामोदर, गणेश, राजाराम व बाळकृष्ण असे चार पुत्र झाले. दामोदर यांचे वंशज मारगावाजवळ लोणी ( भापकर ) व बाळकृष्ण ह्यांचे शिरवळ जवळ भोळी गांवीं घरे बांधून शेतीभाती मिळवून स्थाईक झाले, दामोदर विष्णु ह्यांस भगवंत या नांवाचा मुलगा होता. भगवंतास दामोदर (तात्या) व सखाराम अशी दोन मुले झाली. दामोदर हे हयात असून चिंचवड येथे देवस्थानाकडे नौकर आहेत. दामोदर यास दोन मुलें पैकी वडील मुलगा गणेश दापोडी येथे व कनिष्ठ सखाराम पोलीस खात्यांत नोकर आहेत. बाळकृष्ण विष्णु यांस गणेश नांवाचा मुलगा होता. गणेशास दोन मुले झाली. पैकी वडील शंकर रेलवेकडे नोकर आहेत व पंढरीनाथ घरीच राहून शेतवाडीच्या उत्पन्नाची देखरेख करितात. * नारो निळकंठ यास माधवराव नांवाचे पुत्र होते. माधवरावास गोपाळराव, वासुदेवराव, पांडोबा, राघोबा, व रामराव या नांवाचे पांच पुत्र झाले. ६ गोपाळराव सोनोरीस सावकारी धंदा करीत असत. यांचा स्वभाव सात्विक व भोळसर असल्यामुळे यांच्या कुळांनीं यांस थापा मारून रकमेच्या फेडीची मुदत पूर्ण जाहल्यावर फिरून मुदत मागावी व यांनी कायद्याचा विचार न करतां भरवसा ठेवून । कुळांना तोंडी मुदत द्यावी, या व्यवहाराचा परिणाम साहजिकच त्यांचे हयातीअखेर कागदोपत्रीं भरभराटीचा दिसून आला, परंतु सर्व रक्कम कायद्याबाहेर गेली असल्यामुळे बुडाली. लबाड लोकांनी अशा रीतीने त्यांच्या भोळसर स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना बुडविलें. अशा रीतीने या सावकारी धंद्यांत सर्वस्वी बुडून शिवाय वडिलार्जित ही थोडे-बहुत जवळ होते तेही गेले. यास कोंडोपंत म्हणून पुत्र झाले, व कोंडोपंतास