पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण बारावें. १५५ हा होय. यांची ओव्हरसियरची परीक्षा पास झाली असून हल्ली ते निराकॅनॉलवर ओव्हरसीयर आहेत. रंगनाथ लक्ष्मण यांनी बरीच वर्षे सोनोरी गांवचे कुलकर्त्याचे काम केले. नंतर ते पुणे येथे येऊन राहिले. पुण्यास असतांना जिल्ह्यांतील आफू कंत्राटदाराकडे ते म्यानेजरचे काम करीत होते, त्यांस विष्णु, केशव, व दामोदर अशी तीन मुले झाली. विष्णु हे सव्र्हे खात्यांत मोजणीदार होते. नोकरी पूर्ण झाल्यावर त्यांनी पेनशन घेतले. यांना मुलें तीन. पैकीं वडील मुलगा विनायक हा हल्ली रेलवेकडे नोकर आहे. रंगोपंताचे दुसरे पुत्र केशव हे सबओव्हरसियरची परीक्षा इ. स. १८९१ सालीं पास होऊन त्यांचा नंबर गॅरंटड जागेमध्ये आल्यावर त्यांची नेमणूक इंजिनियर खात्यांत खानदेशजिल्ह्यांत झाली. त्याच जिल्ह्यांत त्यांनी तेहतीस वर्षे नोकरी करून इ. स. १९२४ साली पेनशन घेतले. हल्ली ते पुण्यास आपले घरीं ( शुक्रवार पेठ ३५५ ) रहात आहेत. हे फार मेहनती असल्यामुळे यांची सरकारी कामें उत्तम प्रतीची, कमी खर्चात व मुदतीत होत असत; म्हणून वेळोवेळी यांची शिफारस त्यांचे वरिष्ठ अधिका-यांकडून होत असे. हे इ. स. १९१४ सालीं ओव्हरसियर झाले. यांना इ. स. १९१८ सालीं * रावसाहेब ' हा किताब मिळाला. पुढे १९२१ साली हे असिस्टंट इंजिनियर झाले. व इ. स. १९२३ साली यांना ‘रावबहादूर ‘हा बहुमानाचा किताव सरकारांतून मिळाला. प्रस्तुत ग्रंथाचे संपादक केशव रंगनाथ ते हेच होत. यांस एक पुत्र सदाशिव या नांवाचे आहेत. त्यांची B.Sc. ची परीक्षा पास झाली असून हल्ली ते इन्कमटॅक्स आफिसमध्ये नोकर आहे. ह्या ग्रंथांतल स्थलविषयक चित्रांचे फोटो यांनीच घेतले आहेत. पानसे फ्यामिलींत हेच पहिले B. Sc. होत. दामोदर रंगनाथ हे स्कूल फायनलची परीक्षा पास झाल्यावर मुंबईत राहून, ज्युबिली टेकनिकल स्कूल येथे शिक्षण घेऊन L. M. E. झाले. हेच पानसे घराण्यांत पहिले L, M. E होत. हे सी. पी. मध्ये असतांना प्लेग होऊन अकाली मृत्यूचे दाढेत सांपडले, यास अनंत या नांवाचे चिरंजीव असून यांनी इंजिनियरिंग कालेजांत शिक्षण घेऊन मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगचे डिप्लोमे मिळविले आहेत. जयराम मल्हार यास आप्पा या नांवांने लोक ओळखीत असत. इंग्रजी अमलाचे सुरवातसि ज्या वेळी वकिलीची परीक्षा निघाली त्या पहिल्याचे वर्षी हे त्या परीक्षेत पास झाले होते. हे पुण्यास राहून वकिली करत असत. यांनी वकिलीचे धंद्यांत उत्तम प्रकारे यश संपादन करून नांव मिळविले. यास पुत्रसंतात झाली नाहीं. | महादेव विठ्ठल यास शामराव, गोपाळ व भुजंग असे तीन पुत्र झाले. पैकी गोपाळ व भुजंग याचे वंशांतील पुरुषांनी काय कामे केली व हल्लीं हयात असलेले पुरुष कोठे आहेत याचा तपास लागत नाही. शामराव यास गजोबा या नांवाचे पुत्र