पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ पानसे घराण्याचा इतिहास. | भिकाजी यादव यास सखाराम व गोविंद असे दोन पुत्र झाले. सखारामपंतास वामन, लक्ष्मण व बळवंत असे तीन पुत्र झाले. वामनराव यास सखाराम, लक्ष्मण व केशव असे पुत्र झाले. सखारामपंतास धडोपंत व रघुनाथ अशी दोन मुले झाली. घाडोपंत हे पुणे ट्रेनिंग कॉलेजांत दोन वर्षे राहून त्या परीक्षेत पास झाले. ते हल्ली पुणे जिल्ह्यांत लोकल बोर्ड मराठी शाळेत हेडमास्तरचे काम करतात. रघुनाथ हे पोलीस खात्यांत कारकून आहेत. केशव वामन हे हल्लीं इंदूर येथे तुकोजीराव होळकर यांच्या ज्येष्ठ मातेकडे खासगी कारभारी आहेत. | गोविंद भिकाजी यास रामचंद्र या नांवाचा मु ठगा होता, तो पुण्यास गोसावीपुयांत आनंदगीर यांचेकडे नोकर होता. यास पुत्र शंकरराव हे हल्ली तळेगांव कोर्टात कारकुनीचे कामावर आहेत. भगवंत हरी यांचे वंशांतील पुरुषांपैकीं हल्ली कोण हयात आहेत व काय करतात यांची माहिती मिळत नाही. | विठ्ठल तुकदेव यास चिमणाजी, लखमाजी, मुकुंद, महादेव व निळोबा असे पांच पुत्र होते. चिमणाजी यास विसोबा पुत्र होता. विसोबास चार पुत्र होते. पैकी विठ्ठलाशिवाय बाकी तिघांच्या विस्तारासंबंधाने माहिती लागत नाहीं. विठ्ठलास गणेश व गणेशास मार्तड या नांवाचा पुत्र होता. मार्तड हे ओव्हरसियरची परीक्षा पास झाले होते. हे पुण्याजवळील खडकवासलें तलावाचे काम सुरू असतां त्यावर नोकर होते. ते काम संपल्यावर इंजिनियरिंग कॉलेजांत सबओव्हरसियरचे क्लासावर त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक झाली. तेथेच नोकरी पूर्ण करून त्यांनी पेनशन घेतले. यास कृष्णराव या नांवाचे पुत्र होते. ते बी. ए. झाल्यावर रेव्हिन्यु खात्यांत नोकर झाले. त्यांनी पंढरपूर येथे काही दिवस अॅक्टिग मामलेदारीचे काम केले. पुढे बार्शी येथे असतां त्यास अकाली मृत्यु आला. त्यास रामचंद्र, भगवान व प्रभाकर अशी तीन मुले झाली. रामचंद्र हे हल्ली पुणे येथे इंजिनीयर खात्यांत ओव्हरसियर आहेत. भगवंतराव वकिलीचे परीक्षेत पास होऊन नाशिक येथे वकिली करीत आहेत. प्रभाकर हे शिक्षण घेत आहेत. | मुकुंद विठ्ठल-मुकुंदरावाने आपले शेवटचे आयुष्य चतुर्थाश्रमांत घालविले. त्यांस मल्हार हा मुलगा होता. मल्हारीस पुढे सखाराम, लक्ष्मण, व जयराम अशीं तीन मुले झाली. सखाराम यांनी मृत्युसमयीं संन्यास धारण केला होता. लक्ष्मण यास गंगाधर व रंगोपंत अशी दोन मुले झाली. गंगाधर हे रेव्हेन्यु खात्यांत कारकुनीचे जागेपासून चढत चढत मामलदारीचे हुद्यावर चढले. नोकरी संपल्यावर त्यांनी पेनशन् घेतले. यास बाळकृष्ण, नारायण व दत्तात्रय अशी तीन मुले झाली. बाळकृष्ण व नारायण हे दोघे बंधु सव्र्हे खात्यांत मोजणीदार होते. दत्तात्रय हे हल्ली पुणे जिल्ह्यांत सरकल इन्स्पेक्टरचे कामावर आहेत. यास मुलें दोन; पैकीं वडील मुलगा गोविंद