पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। प्रकरण बारावे. १५३ ३. रामाजी परशुराम यांचा वंश, रामाजीस तुकोबा हा पुत्र झाला. तुकोबास सात पुत्र झाले. पैकी नारोबा, विठोबा यांचा मात्र वंश वाढला. बाकीच्या पांचांचा वंश संतति न झाल्यामुळे खुटला. नारोवास रंगोबा व हरिपंत असे पुत्र होते. रंगोवा हे शिरवळ गांवाजवळ आपले वतनाचे लोणी गांव येथे जाऊन राहिले. रंगोवा हे सातारकर महाराज यांचे दवारांत सभासद होते. शिवाय वंदन किल्यावर यांना पंचवीस स्वारांची असामीं होती, ती त्यांचे पश्चात् त्यांचे चिरंजीव रामाजी यांस मिळाली. रामाजी यास खंडोपंत, विठ्ठलपंत व रंगोपंत अशी तीन अपत्ये झाली. खंडोपंताचे वंशांत हल्ली रघुनाथराव हे एकटेच पुरुष हयात असून ते इंदुराकडे आहेत अशी माहिती मिळते. विठ्ठलपंतास पणतू दोन; वडील रामचंद्र है हल्ली रोव्हिन्बु खात्यांत कारकून असून, दुसरे हरिपंत तारखात्यांत नोकर आहेत. रंगोपंत यास पुत्र रावजी हा होता. त्यास महादेव, सदाशिव, बाळकृष्ण व वामन अशी चार मुले झाली. महादेव यांस विष्णु व गणेश अशी दोन मुले झाली. पैकी विष्णु मयत असून त्याचे चिरंजीव महादेव हे अज्ञान आहेत. गणेश विष्णु हे हयात असून त्यांच्या तीन मुलांपैकी वडील मुलगा नारायण हे इंजिनीअर खात्यांत ओव्हरसियर आहेत व बाकांचे दोन अज्ञान आहेत. वामन रावजी हे हल्लीं ह्यात आहेत. दिवें गांवीं राहून तेथील कुळकरणाचे काम यांनी बरेच दिवस केले. आतां ते आपले घरी लोणीस राहून शेतीभातीची व्यवस्था पाहतात. यांना दामादर, केशव व विनायक असे तीन पुत्र झाले. पैकी दामोदर हे निराकॅनालवर इरिगेशन खात्यांत तारमास्तर आहेत. । नारोबाचे चिरंजीव हरीपंत हे दिवे येथे राहिले. यास यादव व भगवंत अशी दोन मुले होती. यावे यास केशव, नारायण व भिकाज अशी मुले होतीं. केशव याचे नातवाचे नांव विठ्ठल असे होते. त्यास बळवंतराव या नांवांचे पुत्र होते. बळवंतराव यांनी पुणे येथे येऊन व्यापार धंदा केला. त्यांत त्यांनी चांगलेच यश संपादिले. यांनी पुणे येथे ( शुक्रवार पेठ घ. नं. ८२ ) राहण्यासाठी घर बांधले. यास तीन पुत्र यशवंत, नरहरी व वामन या नांवाचे झाले, पैकीं वडील यशवंत सॅनिटरी इंजिनियरचे ऑफिसांत नोकर आहेत. दोघे धाकेट शिक्षण घेत आहेत. नारायण यादव यास बाळाजी व त्यास गणेश या नांवांचे मुलगे होते. गणेश यास बळवंत हा मुलगा होता. बळवंत हे पुणे येथे तुळपुळे वकील यांचेकडे कारकून होते. त्यास दोन पुत्र झाले. वडील सखारामपंत हे पुण्यास वैद्यकी करतात व धाकटे महादेव हे इंजिनिअर खात्यांत ऑफिसमध्ये क्लार्क आहेत. ।