पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

કર पानसे घराण्याचा इतिहास. २. अर्धले पानसे. (बाबाजी लक्ष्मीधर यांचा वंश) बाबाजींचे पुत्र बापूजी व बापूजीचा नातू निंबाजी होता. निंबाजीस दोन मुलगे होते, वडील बापूजी व धाकटा बाबाजी. बापूजीस सखाराम हा पुत्र होता. त्यास चिंतोपंत, आत्माराम व राघोपंत या नांवाचीं तीन मुले झाली. चिंतोपंतास हरि, विठ्ठल व वामन हे मुलगे होते. हरि यांच्या तीन मुलांपैकी वडील गोपाळराव हे हयात असून पुणे येथे दस्तऐवज लिहिण्याचे व मुखत्यार वकिलाचे काम करीत असतात. त्यांनी स्वतः पुण्यांत घर (शुक्रवार पेठ घ. नं. ६१७) बांधले असून त्यांतच ते राहात आहेत. वामन चिंतामण यांचे वडील पुत्राचे नांव विनोबा हे होते. विनोबास धोंडोपंत, गणपती, गोविंद, व अनंत अशी चार मुले झाली. धोंडोपंत यांचे लग्न उमरेजकर जोशी यांची कन्या गंगूबाई हिचेबरावर झालें. धोंडोपंत अल्पायुषी वारल्यामुळे गंगूबाईवर त्यांचे बालवयांतच वैधव्याचा घाला आला. उमरेजकर जोशी हे शिक्षणखात्यांत नोकर असल्यामुळे त्यांनी गंगूबाईस वैधव्यदशा प्राप्त झाल्यावर शिक्षण देण्यास सुरुवात केली. गंगूबाई या चलाख-बुद्धीच्या होत्या या व्हरनाक्युलर फायनल परीक्षा पास झाल्याबरोबर ट्रेनिंग कॉलेजांत गेल्या. तेथे तीन वर्षे राहून त्यांनी तिस-या वर्षाचे सरटिफिकेट मिळविले. हल्ली त्या पुणे म्युनिसिपल मुलींची शाळा नं. ४ येथे हेडमास्तरीण आहेत. विनोबाचे दुसरे पुत्र गणपतराव, यांस मोरोपंत व बाबूराव हे दोन पुत्र झाले. मोरोपंत अल्पायुषी झाले. त्यांची स्त्री शांताबाई यांनी पुढे शिक्षण घेण्यास आरंभ केला. त्या हिंगणे येथील कर्वे महिला विद्यापीठांत राहून जी. ए. झाल्या. हल्ली त्या शिक्षणखात्यांत नोकर आहेत. आत्माराम सखाराम यांचे पुत्र यशवंत हे राम--उपासक होते. दिवें गांवांत यांनी मंदिर बांधून त्यांत रामाच्या मूर्ति स्थापन करून रामजन्माचा उत्साह मोठ्या प्रमाणांत सुरू केला. तो अद्याप त्यांचे वंशज करीत आहेत. यशवंतरावास दोन मुले झाली, पैकीं वडील मुलगा दत्तात्रय हा पुणे येथे फरग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थी आहे; व धाकटा कृष्णा हा इंग्रजी शाळेत शिकत आहे. | बाबाजी निंबाजी यास अनंत हा पुत्र होता. अनंत याचे नातू सदाशिव हे होत. सदाशिव यांस निंबाजी म्हणून एक पुत्र झाला. ते सबरजिस्टरचे कामावर होते. त्यांनी नोकरी पुरी केल्यावर पेन्शन घेतले. ते हल्ली पुणे येथे राहात आहेत. या निंबाजीस गजानन, विनायक व पांडुरंग या नांवाचे तीन मुलगे आहेत. वडील गजानन हे मिलिटरी अकाउंट आफिसांत नोकर आहेत. दुसरे विनायक हे शिक्षकाचे काम करि. तात व धाकटे शिक्षण घेत आहेत.