पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५१ • प्रकरण बारावे. राहिलेल्या तीन पुत्रांचा वंश ( ३ ) * रामाजी परशुराम यांचा वंश" (४) “विसाजी परशुराम यांचा वंश" ( ५ ) * कृष्णाजी परशुराम यांचा वंश' या नावाखाली दिला आहे. । ३ तानाजी भुतावाः--यांस बालावा, अंताजी व परशुराम असे तीन पुत्र झाले. वालावा यांच्या वंशांत हल्लीं कोण पुरुष हयात आहेत व ते कोठे राहतात याचा । तपास लागत नाही. अंताजी याने वाठार गांवचे कुळकरण हे वतन मिळविले, परंतु पुढे दोन पिढ्यांनंतर त्याच्या वंशांत कोणी शिल्लक राहिले नाही. यामुळे त्याचे बंधूचे ( परशुरामाचे ) वंशज वतनाचे मालक झाले. परशुरामाचे पणतू तानाजी यास सखाजी व दादाजी या नांवाची दोन मुलें होतीं. सखाजी वाठारगांवीं राहून वृत्ति पाहू लागले. म्हणून त्यांच्या वंशास वाठारकर असे म्हणू लागले. या कारणामुळे सखाजी तानाजी यांचा वंश (६) “वाठारकर, पानसे' या नावाखाली दिला आहे. दादाजी तानाजी हे आपले वडिलोपार्जित वृत्तीच्या भाळी गांवीं च कायम राहिले; यामुळे यास भोळीकर असें नांव पडले. दादाजी तानाजीचा वंश (७) * भोळीकर पानसे " या नांवांखाली दिली आहे. १. तोंडलकर पानसे. ( बालावा भुतावा यांचा वंश.) वालावास रामजी नांवाचे पुत्र झाले; रामजीस बाप्पाजी, मल्हार व भुतोवा असे तीन मुलगे होते. पैकीं भुतोवाचे नक्कल झाले. बाप्पाजीचे पुत्र साबाजी व साबाजीस बहिरव, रंगो, बयाजी, आबाजी व रावजी असे पांच पुत्र झाले. पैकी रंगो, आवाजी व रावजी या तिघांचे नक्कल झाले; बहिरव यांचे पश्चात् त्यांच्या सहावे पिढीत कोणी पुरुष हयात राहिला नाहीं. बयाजी साबाजी यांच्या वंशांतील वहिरव हे पांचवे पुरुष होत, यास श्रीधर व पांडुरंग या नांवांची दोन मुले झाली, ती हल्ली तोंडल येथे रहातात. मल्हार रामजी यास चार मुले झाली, पैकी मोरोपंत व गोविंद या दोन मुलांचा नष्टांश झाला. विसाजी याचे वंशज हल्ली कोठे आहेत त्यांचा तपास लागत नाही. फक्त रामजी याचा वंशविस्तार झाला. रामजीचे पुत्र के सो व केसो यास कान्हो या नांवाचे पुत्र होते. दिव्याच्या पत्रांत उल्लेख केलेले हेच कान्हो केशव होत. कान्हो याचे नातू आनंदराव व आनंदरावास धोंडदेव या नांवाचे पुत्र झाले. धोंडोदेवास बाबूराव या नांवाचे पुत्र होते. बाबूरावास कृष्णराव या नांवाचे पुत्र होते. ते हल्लीं हयात असून आपल्या गणेश नांवाच्या मुलाच्या, शिक्षणासाठी पुण्यास येऊन राहिले आहेत.