पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण बारावे. वंश-विस्तार-विवेचन | मूळ कर्नाटकांतून महाराष्ट्रांत आलेल्या गोविंदपंतापासून आज हयात असलेल्या पुरुषांपर्यंतची साग्र माहिती देणारा वंशवृक्ष या पुस्तकास जोडला आहे. वंशवृक्षावरून त्यांतील पुरुषांनी केलेल्या कर्तबगारीचा उल्लेख होत नाही. राजदरवारों अगर दुस-या महत्त्वाच्या प्रसंगी ज्या पुरुषांचे संबंध आलेले होते, त्यांचे उल्लेख मागें पूर्वार्धात आलेले आहेत. परंतु त्याशिवाय इतर पुरुषांचा नामनिर्देश व त्यांच्या कामगिच्या तसेच हल्ली हयात असलेले पुरुषं, त्यांचे वास्तव्य व व्यवसाय या संबंधाची माहिती देणें अवश्य असल्यामुळे ती या भागांत देण्याचे योजिलें आहे. । वंशवेलांतील एकंदर सर्व पुरुषांचे नामनिर्देश या प्रकरणांत आलेले नाहीत, परंतु कर्तृत्वाच्या मानाने ज्यांची नांवे आली आहेत त्यांचे संबंध त्यांचे मागील पुरुषांश अगर पिढीशी जोडले आहेत; त्यामुळे वाचकांचा घोटाळा न होतां अमका मनुष्य अमक्याचा अमूक संबंधी हे नाते चटकन लक्षात येईल. सारांश अशा रीतीने वंशवेल कोठेही न तोडतां तो शेवटपर्यंत अखंड ठेविला आहे. | गोविंदपंत मूळ पुरुष कर्नाटकांतून बालेघाटावर आले. त्यांच्या पुढील पिढीतील वंशजांची नांवें प्रकरण १ यांत आलेली आहेत. गोविंदपंत धरून भुतावा हे त्यांच्या पुढील पिढीतील सातवे पुरुष होत. भुतावास १ बालावा, २ परसावा आणि ३ तानाजी असे तीन पुत्र झाले. । | १ बालावा भुतावाः—हे तोंडल गांवीं राहू लागले म्हणून यांचे पुढील वंशजांस तोंडलकर असे म्हणू लागले. यांच्या पुढील वंशाची माहिती ( १ ) * तोंडलकर पानसे या नावाखाली दिली आहे. | २ परसावा भुतावाः–यास लक्ष्मीधर या नांवाचे पुत्र होते. या लक्ष्मीधरास परसावा ( परशुराम ) विठोबा व बाबाजी असे तीन पुत्र झाले. पैकी विठो.. बाचा वंश पुढील दोन पिढ्यांत नष्ट झाला. म्हणून परशुराम व बाबाजी या दोन भावांत वतनवृत्ति वांटल्या गेल्या. त्या वेळेपासून बाबाजीच्या वंशजांस अर्धले' असे म्हणू लागले; सबब ( २ ) * अर्धले पानसे ' या नावाखाली बाबाजी लक्ष्मीधर यांच्या वंशाची माहिती दिली आहे. लक्ष्मीधराचे वडील चिरंजीव परशुराम यांस लखावा, रामाजी, विसाजी, कृष्णाजी, केसो व रखमाजी असे सहा पुत्र होते. लुखोवा व रखमाजी यास संतति झाली नाहीं. केसी याच्या वंशाचा पुढे दोन पिढ्यानंतर निर्वंश झाला. बाकी