पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૮ पानसे घराण्याचा इतिहास. प्रमाणे पंधरा निशाणे पंधरा गोळ्यांनी उडविली. ते पाहून एलफिन्स्टनने हि गणपतरावाच्या कौशल्याबद्दल प्रशंसा केली. श्रीमंतांनीं हि त्यावेळीं गणपतराव विश्वनाथ यांचा गौरव करून त्यांना बहुमूल्य पोषाक दिला. १०. कलावंतीण. पानशांचे पदरीं, तत्कालीन पद्धतीस अनुसरून एक नृत्यगायनकलेंत निष्णात अशी दिलजान शाब नांवाची कलावंतीण सोनोरी येथे होती. आनंदोत्सवाच्या प्रसंगी तिचे गायननर्तन होत असे. शिवाय, तेथील देवालयांत रोज तिला गायनाची हजेरी द्यावी लागे. याप्रमाणे तिचा सारा जन्म सोनोरी गांवीं गेला. तिच्या मागे तिचं. मुलगी हि हे च काम करी. तिच्या कौशल्याबद्दल तिच्या आईला जी नेमणूक होती ती तिच्याकडे हि चालू होती. खेरीज पानशांनीं सोनोरीस सात बिघे जमीन त्यांत बागबगीचा तयार करून तिला इनाम दिली. ती शके १७७० मध्ये वारली; तेव्हां तिला वारस नसल्याने इनाम दिलेली जमीन खालसा केली. अद्यापि या जमीनीस

  • कलावंतिणीचे शेत " हे नांव चालू आहे.

११. फुलझाडांचा पोक. पुरंदरे दप्तरांत गणपतराव विश्वनाथ पानसे यांस फुलझाडांचा फार शोक होता याबद्दलचे एक पत्र नुकते च उपलब्ध झाले आहे. गणपतरावांनीं सोनोरी येथे आपल्या वाड्यासभोंवतीं जो बगीचा केला होता, त्यांत मोठ्या प्रयत्नाने लहान आकाराच्या दळाच्या बिल्ववृक्षांची रोपे मिळवून त्यांची लागवड केली होती. ती झाडे पाहून नानासाहेब पुरदरे यांनी तशा जातीची रोपे पाहिजेत म्हणून मागणी केली. त्यांना पाठविलेल्या जबाबांत गणपतराव लिहितात की, ८ खानवडी गांवचे बागेत रोपे तयार आहेत. तीं बाळ्या रासकर ( माळी ) यांजकडून घेऊन जाणे. फुलझाडांचा षोक अमीर व फकीर या दोघांनीच करावा, परंतु खानदानांनीं व दौलतदारांनीं तो केल्यास हरकत नाहीं.” वरील बिल्ववृक्ष अद्यापपर्यंत सोनोरी येथे कायम आहेत. पुण्याजवळ हि गणपतरावांनी एक सुंदर बगीचा तयार करून त्यास माणिकबाग हे नांव दिले होते. या बागेस माणिकबाग हेच नांव अद्याप चालू असून तो पानशांच्या च मालकीचा आहे. १२. जेजुरी येथील खंडेरावाची तरवार. महिपतराव लक्ष्मण व रामराव लक्ष्मण पानसे यांनी जेजुरीच्या खंडेरावास एक मोठी कांसवाच्या पाठीची ढाल व वजनदार तलवार ( तेगा ) अर्पण केली. तलवारीवर या दोघांची नांवे कोरलेली आहेत. तलवार फार जड सुमारे ८९ शेर वजनाची आहे. हल्ली या दोन्ही जिनसा जेजुरी येथे देवळांत देवाजवळ ठेविल्या असून प्रेक्षकांस पहावयास मिळतात.