पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावे. १४७ । 111 112 11111 । टार १ घणकरी ४ ओरकस ३ तबेलदार २ जिनगर ६ बाणदार १ फरास २ भालदार १ शिंपी ३ कोठावळे ३ जासूद २ पखालवाले १ रख्तवान ३ खासदार १ परीट। १२ गाडदी •९९ कामाठी २ कलाल | १ बारगीर । गंज पेठ. भवानी पेठ, रविवार पेठ. ८ गारदी ८ गारदी ४ सांडणी स्वार २ शिंपी २ शिंपी १ बाणदार १ बाणदार १ बाणदार | १ गारदी जमादार । १ गाडीवाला नानाची पेठ । | १ गाडदी जमादार १ कोठावळा सोमवार पेठ । १ सुतार १ गाडदी .. .... ... मंगळवार पेठ १ गाडदी सदाशिव पेठ. १ सुतार ९. निशाण मारण्याचे कौशल्य. एकदां एलफिन्स्टन साहेब यांनी आपल्या इंग्रजी पलटणीतील सैनिकांची करामत दाखवून श्रीमंत रावबाजीचे मनावर इंग्रजांचे सामर्थ्याचा पगडा बसवावा म्हणून पुण्यानजीक गुलटेकडीवर निशाणबाजीचे प्रयोग करण्याचे ठरविले व श्रीमंत पेशवे सरकारास ते कौशल्य पाहाण्यास बोलाविले. यावेळी एकंदर तोफखान्याचा कारभार रूपराम चौधरी याच्या दिमतीस गेला होता. इंग्रज सैनिकांची कवाईत व निशाणबाजीचे प्रयोग झाल्यावर श्रीमंतांनी आपल्या पदरचे लोक बोलावून त्यांस निशाणबाजी करण्यास सांगितले. परंतु पहिल्या गोळीस कोणाचें च निशाण बरोबर लागेना. त्यामुळे श्रीमंतांची मर्जी बहुत खडू झाली. ते पाहून एकाने श्रीमंतांना विनंति केली की, गणपतराव विश्वनाथं पानसे यांना बोलावून आज्ञा करावी म्हणजे ते निशाण बरोबर मारतील. यावरून गणपतरावांस आणून निशाण मारण्यास श्रीमंतांनी आज्ञा केली. तेव्हां गणपतराव म्हणाले की, “ श्रीमंतांनी आमचेकडून सर्व कारखाना काढून घेऊन आम्हांस घरी बसविलें, आतां निशाणाचा अभ्यास राहिला नाहीं, तथापि प्रयत्न करून पाहतो. " असे म्हणून निशाण लावून गोळी मारली. तो त्या पहिल्याच गोळीने निशाण उडविले. नंतर दुसरे निशाण लावून ते हि एका च गोळीने उडविले; या