पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास, १ पंचरसीः-सुरजमुखी, चांद, लक्ष्मी, सुमेरासँग, गुलाब, यशवंती, मार्तड, व्याघ्रमुखी, भवानीप्रसाद, बहिरीप्रसाद, लक्ष्मण तक्तराव व महबूब. २ विडीः-काळापहाड, हटीहनमत , जयवंती, दिलदार, दिलपसंत व बिंद्रावन. याखेरीज इतर ठिकाणी नांवे आढळतात तीः-जय, महंकाळी, हनमंत, सवाई लक्ष्मण, राम, दुर्गा, अस्मान्तडा, सत्यशकल, फत्तेजंग, ज्वालाभवानी, सबसिकल फत्तेमूबारख* व सलाबतजंग, | शके १७१८ मध्ये शनवार वाड्यांतील पेशेवसरकारच्या गणपति-उत्सवांत ज्या तोफा उडविल्या त्यांची नांवें:- १ हुजूरवाड्याकडेः–रामबाण, समशेरजंग, चांद, संभूवाण, मनरंजन व महालक्ष्मी. २ कारखान्या बाहेरः-गंगासागर, फत्तेलष्कर, खुमशीभवानी, दर्याभवानी, लक्ष्मी, जयवंती, रेणुका, गुलबदन, नवरतन, व महताप. ३ संगमावरः-जंबुर, सूर्यमुखी व विनायक, | ८, तोफखान्याच्या कारखान्याचा पसारा. शुक्रवार पेठेतील पानशांचे वाड्याशेजारी त्यांच्या तोफखान्यांतील लोकांचा, नवीन तोफा ओतण्याचा व जुन्या दुरुस्त करण्याचा कारखाना होता. हा काळ्या हौदापासून थेट नागाझरीपर्यंत, पूर्व-पश्चिम पसरला होता. यांत च कारखान्यांतील कारागिरांची राहण्याची घरे होती. याशिवाय इतर ठिकाणी हि कारखान्यांतील कामगार लोक रहात होते. कारखान्यांतील नोकर लोकांच्या रहाण्याच्या घरांची एक त्रोटक यादी आढळली आहे ती पुढे दिली आहे. त्यावरून कारखान्याच्या विस्तृत पणाची कल्पना येईल. शुक्रवार पेठ, ४ सुतार २ गोलंदाज २ जेजालदार ४ लोहार १६ खलाशी जमादार ३ ढालाईत ७ बाणांचे कारागीर २२ दर्यावर्दी जमादार १ संदुकाचा हवालदार १ गोळ्यांचा करीगार २६ गाडीवान ५ बेलदार * सबसिकल या तोफेच्या गोळ्याने इष्टुर फांकडा वडगांवचे लढाईत मारला गेला

  • या दोन तोफा हल्ली पुणे येथे मामलेदार कचेरीच्या पुढील दरवाजाचे बाजूस पुरलेल्या आहेत. यांजवरील नांवें मोडी लिपींत असून फत्तेमुबारखपुढे ८४७॥ व सलाबतजंगपुढे ४४४॥ असे वजन दर्शविणारे आंकडे आहेत. हे आकडे बहुधां त्या त्या ताफेतून किती शेर वजनाचे गोळे फेकले जातात त्याचे दर्शक असावेत.