पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावे. १८५ ही वरील हकीकत दंतकथेच्या आधारे दिली आहे. परंतु तपासाअंती या दोन्ही घराण्यांतील वंशजांनी आजपर्यंत म्हणजे सुमारे दोन तीन शें वर्षांत ही शपथ पूर्णपणे पाळिली आहे. यावरून वरील दंतकथेत बरेंच सत्य असावे. | ६. पानसे आडनांवाची दुसरी घराणी. आमच्या घराण्याचे गोत्र मुद्गल आहे. ज्यांचे गोत्र मुद्गल नाहीं पण आडनांव पानसे आहे अशी कांहीं दुसरी घराणी आज महाराष्ट्रांत आहेत. वाई तालुक्यांत वाई गांवापासून दोन कोसांवर पसरणी या गांवीं पानशांची वस्ति आहे. त्यांचे गोत्र शांडिल्य आहे. या शांडिल्य गोत्री पानशांचा मुद्गल गोत्री पानशांशीं शरीरसंबंध झाल्याचीं कांही उदाहरणे हल्लीं अस्तित्वात आहेत. तसे च नगर जिल्ह्यांत मौजे बेलवंडी तर्फ करडे येथे व सिनानदीच्या कांठीं मलठण गांवीं पानशांची वस्ति आहे; परंतु त्यांचे गोत्र वाशिष्ठ आहे. या वाशिष्ठगोत्री पानशांचा व मुद्गलगोत्री पानशांचा शरीरसंबंध झाल्याचे अद्याप आढळून आलें नाहीं. वरील दोन भिन्न गोत्री पानसे घराण्यांखेरीज उमरावतीस एक पानशांचे घराणे आहे. परंतु ते यजुर्वेदी असून कौशिक गोत्री आहे. ७. तोफखान्यासंबंधी मनोरंजक माहिती. शुक्रवार पेठेत पानशांचे वाड्याजवळ नवीन तोफा करण्याचा कारखाना होता. हल्लीं ज्या जागेवर सिटी पोलीस लाईन व मामलेदार कचेरी आहे, त्याच जागेवर हा कारखाना होता. कारखान्यास एक मोठे तटाचे आवार होते. या आवाराची चतुःसीमा पुढील प्रमाणे एका लेखांत आम्हांस आढळली. ती येणे प्रमाणेः पसः --गणपतीचे देऊळ, पाश्चमेस-शेवाळे यांचा वाडा, उत्तरेस-इमारतीचा मोठा दरवाजा, व दक्षिणेस-बारा इमामचा पीर. यांपैकीं गणपतचे देऊळ व बारा इमामचा पीर हे हल्ली कायम आहेत. हल्लीच्या पोलीस लाइनीजवळ असलेला मुख्य दरवाजा व तटाचा पडका भाग पाहिली वृद्ध माणसे अद्याप पुण्यांत हयात आहेत. तोफांची नांवें. ! तोफखान्यांतील सर्व तोफांस नांवे होती. ती कोणती हैं आज समजत नाहीं; पण कांहीं कांहीं तोफांची नांवे आढळतात. शके १७०० मध्ये मशीरगडाहून पुण्यास पुढील नांवांच्या तोफा मागविल्याचा दाखला आढळतो. १०