पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૪૨ पानसे घराण्याचा इतिहास. देवांची व्यवस्था पाहावी व दरवर्षी जमाखर्च सरकारांत दाखल करावे, असा निकाल झाला. यामुळे पुढे ट्रस्टी म्हणून हा गांव सरदार यशवंतराव वामन यांचे कडे च राहिला व अशा रीतीने त्यांचा जहागिरदारीचा मान त्यांच्याकडे कायम राहिला. । * जन्माष्टमीच्या उत्सवाकरितां पुढील प्रमाणे योजना केली होती. वादशाही इनामांत देशपांडेपणाचे जे उत्पन्न ( जमिनी ) होते, त्या जामनी ज्याच्या त्यानें वांटून घेतल्या. परंतु गांवचे वसुलांतून देशपांडेपणाबद्दल जो हिस्सा रोकड मिळत असे तो इंग्रज सरकारने बंद करून त्या हक्काबद्दल नक्त नेमणूक ५५० रु. ची करून दिली होती. या नक्त नेमणूकीची निम्मी रकम पानगांवकर शिवाजी खंडेराव पानसे यांच्या वंशजाकडे गेली, वाक्रीची निम्मी रकम राहिली ती सोनोरीकर पानशांची राहिली. ही रक्कम वांटून न घेतां तिचा विनियोग जन्माष्टमीच्या उत्सवाकडे करण्याचे ठरले. पुढे जे भाऊबंद स्वतंत्र उत्सव करण्यास तयार झाले, त्यांना त्यांच्या हिश्शांप्रमाणे वरील नक्त रकमेची वांटणी करून दिली. त्यामुळे एका उत्सवाचे, रामचंद्र गोविंद, गहिनीनाथ माधव, वामनराव यशवंतराव व गणपतराव दामोदर, यांच्याकडचे असे चार उत्सव झाले. याशिवाय पानगांवास हि पानसे हा उत्सव त्यांना मिळालेल्या उत्पन्नांतून करीत असतात. कृष्णराव दामोदर यांचे वडिलांनी उत्पन्नांतील भाग मुळीच घेतला नाही, यामुळे उत्सव करण्याची जबाबदारी त्यांचेवर राहिली नाही. हे सर्व ठिकाणचे उत्सव मोठ्या थाटाने होत असतात. वर सांगितल्याप्रमाणे जी मूर्ति भट-. जीच्या गांठोड्यांत निघाली तिच्या बरहुकूम चांदीच्या नवीन उत्सवमूर्ति करून प्रत्येकांनी तिची स्थापना आपआपल्या देवघरांत केली. अलीकडे १०।१५ वर्षात धार्मिक भावनेच्या अभावामुळे व खर्चाची तोडे वाढल्यामुळे आणि वनपुरी गांवचा तंटा उद्बवल्याने उत्सवाचे मान कमी कमी होत चालले आहे. हा कालगतीचा महिमा होय ! | दिवे येथील अर्धले पानसे यांचे घराण्यांतील यशवंत आत्माराम हे राम-उपासक होते. त्यांनी आपले घरी रामाच्या मूर्ति स्थापून रामजन्माचा उत्सव सुरू केला. यास सुमारे पन्नास साठ वर्षे झाली. अद्याप पर्यंत हा उत्सव चालू आहे. याशिवाय इतर पानसे घराण्यांत त्यांच्या कुलदैवतांशिवाय इतर उपास्य दैवते । नाहीत. ३. पानसे घराण्याची शैक्षणिक प्रगति. | पानसे मंडळींनी कालास अनुसरून निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या प्रकारे शिक्षण घेऊन आपली ऊर्जितावस्था करून घेतली असल्याने या मंडळींत परिस्थित्यनुग्रहण ( Adaptability ) हा गुण प्रामुख्याने वसत असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. प्रथम ही मंडळी जेव्हां कर्नाटकांतून बालेघाट आली, तेव्हां त्यांनी भिक्षुकी सोडून जोसपण,