पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावे. १४१ प्रमाणे च यावेळी त्यांच्या स्वप्नांत एक ब्राह्मण येऊन त्याने सांगितले की, “ मी अग्नीच्या ज्वालेंत सांपडलों आहे, त्यांतून तू मला बाहेर काढ. " पानसे हे लागलीच गांवांत जाऊन तपास करीत असतां त्यांना असे आढळून आलें कीं, एका मंदिरास आग लागून ते जळत आहे. त्यांनी ती मंदिरास लागलेली आग विझवून त्यांतून देवाची मूर्ति बाहेर काढली. ही मूर्ति तांडवकृष्णाची कानडी पद्धतीच्या बनावटीची आहे. ती पितळेची सहा अंगुले उंचीची आहे. कुंजवनांत आपल्या खेळगड्यांत दीड पायावर उभे राहून श्रीकृष्ण नाचत असून, त्यांच्या दोन्ही हातांत लोण्याचे दोन गोळे आहेत व समोर दोन गाई त्यांच्या मुखाकडे पहात आहेत, अशी या मूर्तीची घडण आहे. ही हि मूर्ति वरीलप्रमाणे च हल्लीं रामचंद्र गोविंद यांचे देव्हा-यांत आहे. या वरील कारणांमुळे पानसे हे पुढे कृष्णोपासक बनले. श्रावणांत जन्माष्टमीचा उत्सव त्यांच्या घरी फार मोठ्या प्रमाणांत होऊ लागला. श्रावण व॥ १ पासून नऊ दिवस कथाकीर्तने होऊन, दशमीस गोपाळकाला व लळित होऊन एकादशीस सकाळी उत्सव समाप्त होई. दहीहंडी फोडण्याचा मान सासवडकर सोपानदेवाच्या मठांतील मठपतीकडे दिला गेला, तो अद्याप चालू आहे. काल्याच्या दिवशी सर्व गांवक-यास प्रसाद मिळे. अद्याप अशा च रीतीने उत्सव होत असतो. इंग्रजी अंमल झाल्यानंतर सरंजामी उत्पन्न जाऊन खासगी व देवस्थानी उत्पन्न तेवढे शिल्लक राहिले. त्यांत सोनोरी, वनपुरी, सांगवी, तुळजापूर, सावरदरी व गंगापूर ही गांवे आली. पुढे जेव्हां पानसे घराण्यांत गांवांच्या मोठ्या वांटण्या झाल्या तेव्हां त्यांत देवाच्या उपभोगाचे गांव वनपुरी हे वरील सर्व गांवांत जमा करून एकंदर वाटणी केली. त्या प्रमाणे देवस्थानांच्या हि वांटण्या केल्या. विठ्ठलाचे देवस्थान एकाकडे, श्रीरामाचे दुसरीकडे, लक्ष्मीनारायणाचे तिसरीकडे जाऊन ज्यांनी त्यांनी आपल्या देवस्थानची व्यवस्था करण्याचे ठरले. ही व्यवस्था तेव्हांपासून शके १८२६-२७: सालापर्यंत निर्वेध चालत होती. फक्त जन्माष्टमीचा उत्सव सर्वांनी मिळून करावा असे ठरलें, शके १८२५-२६ च्या सुमारास पानशांपैकी काही जणांनीं, वनपुरी हा गांव देवस्थानानिमित्त इनाम असून, त्या गांवचे उत्पन्न देवस्थानाकडे खर्च न होतां खासगी कडे होते, ते तसे न व्हावे म्हणून सरकार मार्फत विल्हेवाट व्हावी असा मुद्दा काढून कजा उपास्थत केला. त्या वेळी हा गांव सरदार यशवंतराव वामन पानसे यांचे नांवें खर्ची पडत होता. हा वाद १०।१५ वर्षे चालू होता. वास्तविक देवस्थानाच्या खर्चाची तजवीज मागील पिढ्यांनी केली होती. व ती व्यवस्था कित्येक वर्षे बिन बोभाट चालू होती. त्यामुळे तंट्याला कारण नव्हते, पण निरुद्योगी मनाला स्वस्थ बसवत नाहीं, कांहीं तरी खटपटी लटपटी कराव्या लागतात, त्यामुळे हे भांडण सुरू झाले. शेवटी, सर्व देव, व तो गांव, ज्यांच्या नांवाने खच पडत होता, त्यांचे ताब्यात देऊन, त्यांनी सर्व