पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावे. १४३ कुळकरण आणि देशपांडकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर परशुरामपंत हे पुणे प्रांतीं आलें. त्यांच्या वंशजांनी राजकारणात प्रवेश केला; आणि सरते शेवटी पेशवाईमध्ये माणको विश्वनाथाच्या वंशजांनीं ब्रह्मकर्म सोडून क्षात्रकर्म आंगिकारिलें. आणि त्यांत इतकें प्रावीण्य मिळावलें कीं, इंग्रजासारख्या परकीयांनी सुद्धा त्यांची त्या कामांतील कौशल्याची तारीफ केली. पेशवाईप्रमाणे गायकवाडींत हि पानशांनी राजकारणी कामें केलेली आहेत. | सांप्रतच्या काळीं हि इंग्रजी शिक्षणांत या मंडळीने बरी च प्रगति केली आहे. पानशांची मुख्य वस्ति तीन ठिकाणी आहे. एक पानगांवीं, दुसरी नीरथडी वाजूस भोळी, तोंडळ, लोणी, वाठार या गांवीं व तिसरी दिवे व सोनोरी या गांवी. यांपैकी पानगांवकर पानशांची मजल प्राथमिक शिक्षणापलीकडे फारशी गेलेली नाहीं. नीरथडीकरांनीं दुय्यम व क्वचित् उच्च शिक्षणापर्यंत धांव घेऊन, सरकारी नौकन्या धरल्या आहेत. या दोहों ठिकाणच्या पानसे मंडळीपेक्षां दिवे-सोनोरीकरांनी शिक्षणांत पुष्कळ च अघाडी मारली आहे. याला कारण, दिवसेंदिवस विकट होत जाणारा जीवनार्थ कलह हे होय. पूर्वीसारखा पाऊस भरपूर पडत नसल्याने पिके चांगली येत नाहीत, भाऊबंदकीमुळे इनाम व मिराशी जमिनीची अत्यंत बारीक चीरफाड होत चालली व खेडेगांवांत चरितार्थाला इतर धंदे राहिले नाहींत. हीं व आणखी इतर कारणे हि या गोष्टीला आहेत. त्यामुळे ३०।३५ वर्षांपूर्वी पानसे मंडळी दिवे--सोनोरी सोडून बाहेर पडत नसत. ती स्थिति आतां बदलली आहे; आतां सदर गांवीं पानसे मंडळी फारशी राहिली नाही. या लोकांपैकीं पुष्कळांनी आपलें गांव सोडून पुण्यास येऊन वास्त केली आहे. त्यांनी सर्व दज्र्याच्या सरकारी नौक-यांत, व खासगी व्यवहारांत शिरकाव करून घेतला आहे. शिक्षक, प्रोफेसर, महालकरी, मामलेदार, इंजिनीयर, कंत्राटदार, डॉक्टर, वैद्य, फारेष्ट आफिसर, वकील वगैरे सर्व प्रकारचे खात्यांत ही मंडळी सांप्रत आढळतात. विद्यापीठाच्या सर्व शाखांच्या पदव्या मिळावलेले पुरुष पानसे मंडळींत असून पहिल्या, दुस-या व तिस-या प्रतीचे सरदार व रावसाहेब, रावबहादूर या मानाच्या पदव्या भूषविणा-या व्यक्ति हि यांच्यांत आहेत. स्त्रीशिक्षणांतील प्रगति हि या घराण्यांत हळुहळु होत चालली आहे. ट्रेनिंग कालेजांतून दुसरे वर्षाचे सटिफिकीट मिळावलेल्या कांहीं स्त्रिया या घराण्यांत असुन, सांप्रत एक बी ए व किं एम्. ए अशा दोन पदवीधर स्त्रिया आहेत. साधारणपणे ज्या धंद्यांत अगर खात्यांत गणितासारख्या आंकडे मोडीची विशेष जरूर लागते अशा ठिकाणी पानसे मंडळीचा जास्त शिरकाव झाला असून त्यांत ते आघाडीस येत आहेत. हा विषय या घराण्याच्या विशेष आवडीचा दिसतो. ही सर्व शिक्षणांतील प्रगति गेल्या २५।३० वर्षांचे आंतील आहे. सारांश आम्हीं वर म्हटल्याप्रमाणे पानशांनी परिस्थित्यनुग्रहणांत आपले पाऊल आतांपर्यंत पुढे पुढे च टाकले असून बुद्धिमत्तेत ते कोणत्या हि प्रकारे इतरांपेक्षा कमी दर्जाचे नाहींत.