पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૪૦ पानसे घराण्याचा इतिहास. अखेरीस गोंधळ डाका घालण्याचा रिवाज आहे. याशिवाय ज्यांच्या घरी वरील तीन कुलदैवतांशिवाय जास्त दैवते आहेत त्यांचे दिवस हि वरील प्रमाणेच विधियुक्त साजरे - करावे लागतात. मूल जन्मल्यानंतर एक दोन वर्षाच्या आंत सोनोरी येथलि व दिवें मांवचे हद्दीतील जाधवांच्या वाडींतील अशा दोन ठिकाणच्या सटवाईच्या दर्शनास आईने मुलासह जाण्याची वहिवाट अद्याप कायम आहे. । २. उपास्यदैवते व त्यांचे उत्सव. माणको विश्वनाथ पानसे यांच्या घराण्यांत पूर्वीपासून श्रीरामचंद्राची उपासना होती. त्यामुळे ते व त्यांचे वंशज हे ही उपासना, यथाप्रमाण उत्सव करून चालवीत असत. पानशांची जी शिक्कामोर्तवें उपलब्ध आहेत, त्यांत पहिल्या ओळींत * श्रीराम चरणीं तत्पर हीं च अक्षरे आहेत. हे रामभक्त घराणे नंतर कृष्णभक्त कसे बनले, या बद्दलची पुढील आख्यायिका आहे. एके दिवशी सोनोरीस कृष्णराव माधव यांचा मुक्काम असतां, दुपारच्या जेवणाच्या वेळीं एक ब्राह्मण आला व फार क्षुधा लागली आहे असे त्याने सांगितले. कृष्णरावांनी भोजनाची तयारी आहे, स्नान संध्या लवकर आटोपून येण्यास सांगितले. ब्राह्मणाने आपले बोजके दिवाणखान्यांत ठेवले व तो रामतीर्थाकडे स्नानास गेला. वरा च वेळ झाल्याने कृष्णरावांनी त्याच्या तपासासाठी माणूस पाठविला, पण तो तेथे भेटला नाही; तेव्हां तो कुंडांत बुडाला असेल असे वाटून पाणबुड्याकडून कुंडांत शोध केला परंतु त्याचा तपास लागेना. म्हणून आसपासच्या तळीं विहिरी हि शोधिल्या; तरी हि त्याचा पत्ता लागला नाही. याप्रमाणे शोधांत असतां सायंकाळ झाली. घरांतील सर्व मंडळी उपाशी असल्याने त्यांनी आपल्ले भोजन उरकिलें, पण ब्राह्मणाचा शोध लागल्याखेरीज आपण अन्नग्रहण करणार नाही असे कृष्णरावांनी ठरविले. रात्री ते निद्रिस्थ असतां, तो ब्राह्मण त्यांच्या स्वप्नांत आला व त्याने सांगितले की, * आपण भक्तीने प्रसन्न होऊन तुझ्या घरी आलो आहों. माझे स्वरूप दिवाणखान्यांतल वोचक्यांत सांपडेल. त्याची भक्तिभावानें पूजाअर्चा करीत जा. यामुळे तुझे व तुझ्या वंशजांचे उत्तरोत्तर कल्याण होईल. इतके सांगून तो ब्राह्मण अदृश्य झाला. लागलीच बोजकें उघडून पाहिले तेव्हा त्यांत एक सुंदर गोपाळकृष्णाची मूर्ति व एक गीतेची पोथी सांपडली. तेव्हां कृष्णरावास मोठा आनंद होऊन त्यांनी ती मूर्ति व पोथी नित्याध्या पूजेत ठेविली आणि तेव्हांपासून ते व त्यांचे वंशज कृष्णोपासक बनले. ही मूर्ति पितळेची, अर्ध्या वात उंचीची अंगावर तांब्याचे अलंकार कोरलेली, बहुत सुंदर बनावटीची आहे. हल्ली ती रामचंद्र गोविंद पानसे यांच्या देव्हा-यांत आहे. | एकदां पानसे हे कर्नाटकांत मोहिमेवर असतां, एका गांवीं रात्रीस पेंढा-यांनी गांवास आग लावून लुटालूट केली. त्यावेळी पानसे हे निद्रिस्थ होते. मागील प्रसंगा