पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण अकरावें. कांही उपयुक्त व मनोरंजक माहिती. १. कुलदैवते व कुलाचार. महाराष्ट्रांतील-ब्राह्मणवर्गात मुख्यतः देशस्थ ब्राह्मणांची च वस्ति जास्त आहे. बहुतेक या ब्राह्मण घराण्यांतील कुलदैक्ते व कुलाचार एका च नमुन्याची आहेत. दक्षिणेत गांवोंगांवीं बहिरोवा में ग्रामदैवत असल्यामुळे घरोघर त्याची स्थापना कुलदैवतांत होणे यथार्थ आहे. शिवाय जेजुरीचा खंडोबा व तुळजापूरची भवानी हीं प्रत्येक घरीं कुलदैवतांत आहेत. हीं तीन मुख्य दैवते इतरांप्रमाणे पानसे घराण्यांत हि फार प्राचीन काळापासून आहेत. मुंज, लग्न वगैरे मंगल कार्यारंभीं अक्षत देण्याची व कार्य आटोपल्यावर मुंजा मुलानें, अगर नूतन परिणित वधूवराने या देवाच्या दर्शनास जाण्याची वहिवाट पूर्वापार चालू आहे. तुळजापूर गांव फार लांब, मुसलमान राजांचे हद्दीत व प्रवासाची विशेष दगदग, या कारणांमुळे तेथील देवीच्या दर्शनास जाण्याऐवजी पुरंदर तालुक्यांतील न्हावी गांवचे यमाईस जाण्याचा परिपाठ पडला व तो चः आतां प्रचारांत आहे. न्हावी गांवची यमाई तुळजापूरच्या देवीचे चे ठाणे आहे अशी पानसे घराण्यांत समजूत असल्यामुळे या यमाई देवीची प्रतिमा कुलदैवतांत येऊन तीन वैवतांची चार दैवते झाली. अशा म रीतीने, कांहीं संकट आले असतां मूल होण्याकरितां: अगर एखादं महत्त्वाचे इच्छित कार्य प्राप्त होण्याकरितां, निरनिराळ्या प्रसंगी देवतेस नवस करून कार्यसिद्धि झाल्यावर त्या देवतेची प्रतिमा करून कलदैवतांत स्थापिली आहे. भोळ्या व भाविक देशस्थ ब्राह्मण समाजांत अशाच कारणांमुळे दैवतांची संख्या वाढत गेली. कलकत्त्याची महंकाळी, कोल्हापूरची महालक्ष्मी, मुद्गल येथील मुंजा वगैरे देवतेच्या प्रतिमांच्या स्थापना कांहीं पानशांच्या कुलदैवतांत आहेत. या कारणांमुळे प्रत्येकाच्या घरी यांची एकच नियमित संख्या राहिली नसून पांच, सात अकरा अशी अनियमित संख्या झाली. मुख्य तीन दैवतांच्या पूजेअर्चेचे दिवस सर्वांच्या घरी सारखे च आहेत चैत्री पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा, आश्विन महिन्यांतील नऊ दिवसांचे नवरात्र, मार्गशीर्ष महिन्यांतील चंपाषष्ठीचें सहादिवसांचे नवरात्र व माघ आणि फाल्गुन महिन्यांतील पौर्णिमा हे सरसहा सर्वत्रांच्या घरी कुलधर्माचे दिवस पाळण्यात येतात. दररोज होणा-या पूजेअर्चेखेरीज वरील दिवशीं, तळी भरणे, आरती करणे व ब्राह्मण-सुवासीन पंक्तीस घेणे ही कृत्ये मुख्यत्वे करावी लागतात. या-- शिवाय आश्विन महिन्यांतलि नवरात्रांत सप्तशितीचा पाठ, चंपाषष्ठीचे नवरात्रांत मल्हारीमहात्म्याचा पाठ प्रत्येकाच्या घरी असतो. लग्नमुंजासारख्या शुभ कार्याच्या