पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ पानसे घराण्याचा इतिहास. बांधलेली आहे, तिचा उपयोग पाणी पिण्यासाठी सर्व गांवास होतो. येथील पानशांचे कुलोपाध्याय दीक्षित या उपनांवाचे आहेत. १ वेणुमाधवाचे देऊळः–देऊळ दगडी बांधलेले असून आंत मुरलीधराची मूर्ति स्थापन केलेली आहे. देऊळ कधी व कोणी बांधलें याजबद्दल माहिती मिळत नाहीं. देवाची पूजा गोळे आडनांवाच्या ब्राह्मणाकडे असून, त्यास त्याबद्दल तीन बिघे जमीन पानशांनीं इनाम करून दिली आहे. शिवाय इंग्रज सरकारच्या तिजोरीतून सालीना सात रुपये देवाच्या खर्चासाठी नक्त नेमणूक आहे. * २ खंडोबाचे देऊळः--हे देऊळ गांवालगत गांवाच्या पूर्वेस शिवाजी खंडेराव पानसे यांनी शके १६९९ साली बांधले. देऊळ दगडी असून आंत खंडेरावाची मूर्ति काळ्या पाषाणाची आहे. देवाचे पुजारीपण पानगांव येथील खानदारे या आडनांवाच्या मराठे घराण्याकडे चालू आहे. त्यास पूजा व इतर खचबदल पानशांनीं तीस बिघे जमीन इनाम करून दिली आहे. ही इनाम जमीन त्या घराण्याकडे अद्याप चालू आहे. ४. नीरथडीच गांवें, या गांवीं ( भोळी, तोंडल, गुणंद, लोणी, आणि वाठार ) वर्णन करण्यासारखे कांहीं नाहीं. फक्त वाठार येथे पानशांचा एक वाडा आहे. याबद्दलची हकीकत मागे दिली आहे. - ८ . .