पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दहावे. १३७ पट सांपडला असून त्यांत या कातोबाच्या देवळाचा उल्लेख आहे ( राजवाडे खंड २० पृ. ४०५). तसेच एका जुन्या मिरासपत्रांत वेदरच्या बादशहाचा अंमल दिवें गांवावर होता, असा दाखला सांपडला आहे. यावरून हे देऊळ सुमारे दीड दोन हजार वर्षांपूर्वीचे बांधलेले असावे. | दिवें गांव सासवडकर पुरंदरे यांस इनाम आहे. येथे ब्राह्मणांची अशी वास्त फक्त पानसे यांची च आहे. जाधव यांचे उपाध्येपण हि पानसे यांच्याकडे च आहे. दिवे येथे जनावरास पाणी पिण्याकरितां पानशांनी एक तलाव खोदला आहे. | दिवे येथे व्यापारी पेठ वसविण्याबद्दल छत्रपति शाहु महाराजांनी शके १६३० मध्ये पिलाजी जाधव यास आज्ञा केली. तत्संबंधीचे एक पत्र आढळले आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे:-

  • राज्याभिषेक शके ३४ सर्वधारी नाम संवत्सरे शाहु छत्रपति महाराज यांनी पिलाजी बिन चांगोजी जाधव यास मौजे दिवे येथे पेठ वसविण्यास सोईचे गांव आहे, तरी पेठ वसवावी, तिचे नांव शाहुपुरी असे ठेवावे. त्यास तुम्हांस पेठेचे सेटेपण इनाम वंशपरंपरेने दिलें असे. सासवर्ड येथे सेटेपणाचे जे हक आहेत ते च तुम्हीं अनुभवावे. सासवडखेरीज इतर ठिकाणचे वाणी उदमी आणावे. वतन वंशपरंपरेनें खावें.

यावरून व्यापाराच्या वृद्धीसाठी स्वराज्यांत कसे प्रयत्न होत असत ते दिसून येते. ३. पानगांव, हा गांव सोलापूर जिल्ह्यांतील बार्शी तालुक्यांत बाशरोड स्टेशनपासून उत्तरेस सहा कोसांवर आहे. याला बार्शी पानगांव या नांवाने लोक ओळखतात. गांव कसब्याचा असून वस्ति सुमारे तीन साडेतीन हजार आहे. हवा उष्ण परंतु बार्शी सोलापूर येथील हवेपेक्षा थोडी थंड असून उन्हाळ्यांत पारा ११३ अंशांपर्यंत जातो. हवा कोरडी व निरोगी असल्याने ती आरोग्यदायक आहे. वार्षिक पावसाचे मान अठरा इंचाचे आहे. प्रांत सुपीक असून मुख्य पीक ज्वारी, तूर, कापूस, गहू व भुईमूग यांचे आहे. कापूस चांगला निपजतो. म्हणून त्याची सरकी काढून गट्टे करण्याचे कारखाने बार्शी वगैरे ठिकाणी झाले आहेत. तसेंच बार्शी व सोलापूर या ठिकाणीं कापड विणण्याच्या हि गिरण्या आहेत. पानगांव येथे पानशांचे दोन वाडे आहेत. पैकी एका वाड्याचा नुसता दगडी तट तेवढा शिल्लक असून आंत गोपाळकृष्णाचे देऊळ आहे यास वेणुमाधव असे म्हणतात. हा वाडा सोनोरीकर पानशांच्या मालकीचा आहे. दुसरा वाडा शाबूत असून त्यांत पानगांवकर पानशांची वस्ति आहे. पानगांवकर पानशांस देशपांडे या नांवानें इकडे लोक ओळखतात. ब्राह्मण-वस्तांत केसकर, दीक्षित, घुमरे, पुराणिक, शेटे, गोळे वगेरे आडनांवांची घराणी आहेत. येथे पानशांनी एक मोठी बारव