पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- प्रकरण दहावे. १३५ या बाधेनं कोणी हि ह्या गांवांत मृत्यु पावला नाही. चालू पन्नास वर्षांत, सुमारे पंधरा वीस प्राण्यांस सर्पदंश झाला परंतु त्यांपैकी कोणी हि दगावला नाही, असे आमचे स्वतःच पाहाण्यांत आहे. | सोनेश्वर महादेव व मारुतीचे देऊळः-हीं दोन्ही देवळे दगडी असून वरील बहिरोबाच्या देवळाच्या समकालीन बांधणीची आहेत. | देवीचे देऊळः-हें गांवापासून दक्षिणेस सुमारे दोन मैलांवर सासवड व सोनोरी या दोन गांवाच्या मध्यावर आहे. सोनोरीच्या पाटील काळे आडनांवाच्या घराण्यांपैकी एक गृहस्थ पूर्वी देवीचा भक्त होता; तो नियमाने दरवषी तुळजापुरास तेथील देवच्या दर्शनास जात असे. तो वृद्ध झाल्यावर त्याला जाववेना म्हणून देवीने त्याला दृष्टांत दिला की, मी तुझ्या गांवांतील रोही थळांत ओढ्याच्या काठी येऊन बसले आहे. त्या ठिकाणी येऊन माझे दर्शन घेत जावे. तुजला यापुढे तुळजापुरास येण्याचे कारण नाहीं. दृष्टांताप्रमाणे त्या जागी देवीची स्थापना करून तो पाटील भाक्त करू लागला. पुढे भिवराव यशवंत पानसे यांनी शके १६८६ मध्ये देवीस दगडी देऊळ बांधले. देवळांतील मूर्ति महिषासुर मर्दिनीची असून अष्टभुजा आहे. देऊळ बांधल्यावर पानगांवकर शिवजी खंडेराव पानसे यांनी देवळाभोवती फरशी व ओढ्यांत उतरण्या करितां दगडी पाय-या बांधल्या. पायच्या पुराच्या पाण्याने हल्ली वाहून गेल्या आहेत. हे स्थान फार कडक म्हणून लोकांची या दवविर फार भाक्त आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी वामन भट मंजिरे या नांवाचा एक ब्राह्मण गृहस्थ दिवे गांवीं रहात होता. त्यास महारोगाची बाधा झाली, म्हणून त्याने देवाच्या देवळांत राहून अनुष्ठान केले, सुमारे सहा महिन्यांनी त्याची बाधा दूर झाली; हे आम्हीं समक्ष पाहिले आहे. सासवड, दिवे, अंबोडी वगैरे पंचक्रोशीतील लोक दर मंगळवारी व शुक्रवारी देवीच्या दर्शनास येतात. दरवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेस या ठिकाणी यात्रा भरते. त्या दिवशी सोनोरी येथील बहिरोबाची प्रतिमा पालखीतून मोठ्या समारंभाने देवाच्या भेटीस घेऊन जातात. देवीच पूजा करण्याचा हक्क गांवचे गुरवाचा आहे. पूर्वी कांहीं कारणामुळे पाटलि काळे, देवीच्या पूजेचा हक्क सांगू लागले. यामुळे दोघांत तंटा होऊन तो गांवपंचापुढे आला. पंचानी एक मतांनी शके १७५३ कार्तिक शु॥ १० रोजी खाली दिल्या प्रमाणे निकाल देऊन तो वाद मिटविला. नवरात्रांत देवीवर बांधलेल्या कडाकण्या पैकीं, पांच कडाकणी, व गोंधळाच्या उसांपैकी एक ऊंस पाटील यास द्यावा. भंद घेतल्यास भदेवाल्याच्या हातांस नाडा बांधण्याचा मान व भंद्याच्या उत्पन्नापैकी निम्मे उत्पन्न काळे यानीं घ्यावे. मांसाचा नैवेद्य काळे यांनी घ्यावा व जत्रेच्या वेळी प्रसाद व विडा पहिल्याने काळे यास द्याचा.