पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ पानसे घराण्याचा इतिहास. झाला आहे. बेलांचे, अशोकाचे, बकुळांचे व आवळ्यांचे वृक्ष मात्र आज त्या जाग कायम आहेत. देऊळ बांधण्या पूर्वी या जागीं हल्लीं गांवास लागून असलेला ओढा वहात होता, तो हटवून त्या जागी भराव घालून हे देऊळ बांधले आहे. देवळास एक लाख रुपये खर्च झाला असे सांगतात. देवाच्या अंगावरील हिच्यामोत्यांच्या दागिन्यांची एक याद सांपडली आहे. देऊळ बांधणा-यांच्या वंशांतील कै. रा. रा. सावळाराम कोंडदेव पानसे यांनी देवळाची डागडुजी करून सध्या देवळास नवीन सभामंडप बांधला आहे. पूजाअर्चा व नंदादीप यांची हि व्यवस्था त्यांनी केली असून ती आपल्या पश्चात् अखंड टिकविण्याची योजना ते करणार होते. परंतु त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ती त्यांचे हातून झाली नाहीं. अन्याचा वाडाः- मल्हार जगजीवन ( जगजीवन शामजी यांचे पुत्र ) ऊर्फ मलबा पानसे यांची माहिती मागे येऊन गेलीच आहे. यांच्यावर श्रीमंत दादासाहेव पेशवे यांची विशेष मर्जी असे. हे मुत्सद्दी होते. श्रीमंत थोरले माधवरावसाहेव पेशवे यांचा मुक्काम सोनोरीस शके १६९३ च्या आश्विन शुद्ध द्वादशीस पडला होता. त्या वेळी त्यांच्या बरोबर मलबा होते. पानशांचा वाडा, देवळे, किल्ला वगैरे पाहिल्यावर श्रीमंतांनी मलबास त्यांचा वाडा दाखविण्यास सांगितले, तेव्हां त्यांनी आपले लहानसे घर दाखविलें. त्यावर तुम्हांस हे घर शोभत नाहीं, नवीन मोठा वाडा बांधा आम्ही खर्चाची रक्कम देतो अशी श्रीमंतांनी आज्ञा केल्यावरून दोन वर्षात मलबांनी हा वाडा बांधला व खर्च सरकारने दिला. मलत्रास संतती नव्हती. त्यांचे वंधु जगजीवनराव यांचे टोपण नांव अन्याजीपंत असे होते. अन्याजीपंत व त्यांची मुले पुढे वाड्यांत राहू लागली. या वरून या वाडयास अन्याचा वाडा हे नांव मिळाले. वाडयाची लांबी, रुंदी प्रत्येकीं सुमारे दोनशे फूट आहे. त्याच्या भोंवतीं दगडी तट आहे. वाडा दोन चौकी असून मजबूत बांधणीचा आहे. सांप्रत भाऊबंदकीमुळे वाड्याच्या वांटण्या होऊन निरनिरनिराळ्या खोल्या झाल्याने, पूर्वीचे स्वरूप नष्ट झाले आहे. बहिरोबाचे देऊळः-हे गांवच्या मध्यावर आहे. दक्षिणेतील बहुतेक गांवांची वस्ती दोन हजार वर्षांपूर्वीची आहे, असे इतिहाससंशोधकांनी ठरवले आहे. या प्रमाणे सोनोरी गांव हि फार प्राचीन काळीं वसलेला असून हे देऊळ हि त्या वेळी बांधलेले असावे. दक्षिणेत राक्षसांपासून प्रजेस फार पीडा होऊ लागल्यामुळे काशीहून विश्वेश्वराने आपल्या गणांपैकीं बहिरवनाथाची रवानगी त्यांचे पारिपत्य करण्यासाठी केली अशी पुराणांतरीं हकीगत आहे. गांवोगांव या देवाची देवळे असून त्यास ग्रामदैवत मानले जाते. गांवांतील सर्व लोकांची या देवावर फार भक्ति आहे. विशेषतः सोनोरी गांवांतील लोकांचा दृढ विश्वास बसण्यासारखी गोष्ट अशी आहे कीं, गांवच्या सीमेंत कोणा हि माणसास अगर जनावरांस सर्पदंश झाल्यास त्यास ताबडतोब देवासमोर आणून ठेवल्यास त्याची विषबाधा उतरते. गेल्या कित्येक वर्षांत