पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. | हें निकाल–पत्र गोपाळराव माधव पानसे कुलकरणी यांच्या स्वदस्तुरचे आहे. | मूळची मुर्ति कोणीं अविंधाने सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी फोडली. म्हणून सोनोरी येथलि नारायण आत्माराम पानसे यांनी खटपट करून हल्लीची मूर्ति स्थापन केली आहे. दसराः—दस-याच्या दिवशी सीमोल्लंघनाची मिरवणूक काढण्याची चाल गांवोगांव आहे; परंतु सोनोरी येथे ती ज्या रितीची निघते तशी क्वचितच कोठे असेल बहिरोबा देवाची प्रतिमा पालखीत ठेवून दुपारी सुमारे तीन वाजतां मिरवणूक गांवाबाहेर पडते. मिरवणुकीत सोनोरींतील सर्व लहान थोर, स्पृश्यअस्पृश्य पुरुष मंडळी जमावाने पालखीं बरोबर असते. पालखी दिवे व सोनेरी या गांवच्या सीमेवर जाते, त्याच वेळी दिवे गांवांतील सर्व समाज सोनोरी गांवांप्रमाणेच तेथील कातौंबाची पालखी घेऊन त्या ठिकाणी येतो वहिवाटीप्रमाणे देवाच्या पालख्या एक मेकाला डावी उजवी घालून मानपान देण्याचा समारंभ झाल्यावर शमी-पूजन होते. नंतर सोन्याची देवाण घेवाण होऊन सायंकाळी सर्व समाज आपआपल्या गांव परत फिरतो. मिरवणूक परत गांवांत शिरल्यावर घरोघरच्या स्त्रिया आपआपल्या दरवाज्यासमोर येऊन देवास पंचारती घेऊन ओवाळतात. या मिरवणुकीत गांवांतील लोक आतषबाजीची दारू उडवितात. अशा रीतीने मिरवणूक रात्रीच्या बारा वाजतां बहिरावाच्या देवळांत येते, नंतर देवाची आरती होऊन जो तो आपआपल्या घरी जातो. २. दिवें. या गांवची थोडीशी माहिती सोनोरीच्या माहितीत आली च आहे. हे गांव पुरंदर तालुक्यांत, पुण्याहून पुरंदर किल्लयास जातांना जो घांट लागतो, त्या घाटाच्या माथ्यावर सडकेच्या पूर्वेस पाव कोसावर आहे. गांवची हद्द फार मोठी असून तींत पूर्वी शेतक-यांच्या सोईसाठीं बारा वाड्या वसल्या होत्या. आज त्यांपैकी पांच अस्तित्वांत आहेत. त्यांची नांवे, १ जाधवाची २ कोळ्याची ३ झेंड्याची ४ ढमाची व ५ ढुमाची. त्यांपैकी घाटाच्या माथ्यावर जाधवाची वाडी आहे. तींत जाधवांचा एक मोठा किल्लेवजा वाडा आहे. हे जाधव मूळचे हवेली तालुक्यांतील नांदेड गांवचे रहिवासी. मराठीराज्याच्या अमदानीत नांदेडहून ते येथे आले व चार विघे जमीन, खरेदी करून त्यांनी हा वाडा बांधला. दिवे घाटांतून पुरंदरगडाकडे शत्रूस जातां येऊ नये, म्हणून सातारा व पुणे दरबारने जाधवांना या ठिकाणीं रहावयास सांगून हा किल्लेवजा वाडा बांधावयास सांगितले. महाराष्ट्रांत बहुतेक गांवीं मारुति व बहिरोबा या देवांची स्थापना केलेली आहे. बहिरोबास निरनिराळ्या गांवीं कातोबा, जोतिबा, पोटोबा, चांगोबा वगैरे निरनिराळी नांवे दिलेली आहेत. दिवे येथे कातोबा हे नांव दिलेले आहे. शके ९४७ आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध दशमी शुक्रवारचा एक ताम्र