पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १३३ लक्ष्मीधर भटाचे नातू , रामाजी परशुराम यांच्या शाखेतील निळकंठ विठ्ठल यांनी शके १६९० अगर त्या सुमारास बांधले असावे. याविषयी पुढील एक कथा घराण्यांत चालू आहे. पानसे घराण्यांत दरवर्षी श्रावण महिन्यांत जन्माष्टमीचा उत्सव होत असतो हे मागे आलेच आहे. अशा एका वार्षिक उत्सवांत निळकंठरावाच्या घरची वायकामाणसे कीर्तनास वाड्यांत जात असतां, देवडीवाल्यांने त्यांना अटकाव केला; त्यामुळे ती परत आली. याचा राग येऊन निळकंठराव हे वडोद्यास गेले. तेथे त्यांनी सरकार चाकरी करून बराच पैका जमावला व तो घरीं आपल्या मुलाकडे पाठवून त्यास मुरलीधराचे देऊळ बांधण्यास सांगितले. त्याप्रमाणे मुलाने हे देऊळ बांधलें. पुढे निळकंठराव नौकरी सोडून सोनोरीस आल्यानंतर मागे बडोद्यास असे उघडकीस आलें कीं, निळकंठरावांनी सरकारी पैशांची अफरातफर केली. तेव्हा त्याचा जाब घेण्यास त्यांना सोनोरीस धरणे पाठविले. निळकंठरावांनी अफरातफर झालेल्या सर्व पैशांचा हिशेब त्यांचे पुढे ठेविला व सांगितले की, हा सर्व पैसा देवाच्या कामी लाविला असून त्यापैकी एक कवडी हि घर खर्चासाठी खर्चिली नाही. तेव्हां मला व देवाला दोघांना हि धरून न्यावे. आम्ही दोघे हि सरकारचे गुन्हेगार आहोत. यामुळे धरणेक-यास पंचाईत पडली व त्याने वडोदेसरकारास ही गोष्ट कळविली. बडोदे सरकाराने एकंदर परिस्थिति जाणून धरणेक-यास परत बोलाविलें व ती रक्कम देवस्थान-खात्यांत खर्ची टाकिली. कृत्यापेक्षा हेतूकडे लक्ष देऊन ही गोष्ट मिटविण्यांत आली. तो काळ स्वराज्याचा होता, त्या मुळे या प्रसंगाचा परिणाम स्वराज्यास साजेसाच झाला. देवाची मूर्ति काळ्या पाषाणाची आहे. श्रीगोपालकृष्ण कुंजवनांत आपल्या दीड पायावर उभे राहून मुखाने मुरली वाजवीत आहेत; भोंवतालच्या कळपांतील गाई त्या मुलीच्या मधुर आलापास मोहित होऊन प्रेमानंदाने शेपूट उभारून धांवत येत असून त्यांपैकी एक गाय लडिवाळपणाने पाय चाटीत आहे व दुसरी निश्चल स्थितीत एकाग्र चित्ताने श्रीकृष्णमुखाकडे लक्ष्य वेधून पहात आहे अशा रीतीची मूर्तीची बनावट आहे. देवाचे बालरूप आहे. वनांत गाई राखण्याच्या वेळेचे असल्यामुळे ते विवाह होण्याच्या पूर्वीचे आहे, हे उघड आहे. प्रभावळींत मध्यावर उभी आहे ती रुक्मिणीची मूर्ति पांढ-या दगडाची असून कोणी हौशी भक्ताने तिची स्थापना मागाहून केलेली आहे. प्रभावळ काळ्या पाषाणाचीच असून सुंदर नकशीची आहे. मूर्तीची, उंची साडेतीन फूट आहे. देऊळ काळ्या घोटीव पाषाणाचे असून हा पाषाण बारामतीजवळील पणदरे गांवचे खाणींतील आहे. आज हि या पणदरे गांवच्या खाणींतील दगड प्रसिद्ध आहेत. देवळाचे शिखर फार उंच व नकशीदार, पुण्यातील तुळशीबागेच्या राममंदिरावरील शिखराप्रमाणे प्रेक्षणीय आहे. सभामंडप व दोन्ही बाजूच्या दुमजली इमारती सध्या पडल्या आहेत. तसेच आवारात असलेला देवळा सभोंवतालचा बगच्या हि हल्ली नामशेष