पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ पानसे घराण्याचा इतिहास. तळेः- पानसे यांनी राहण्यासाठी वाडा, देवळे, किल्ला वगैरे बांधले. पुढे त्यांना त्यांचे पागेतील हत्ती, घोडे, उंट वगैरे जनावरांस पाणी पाजण्याची व तसेच त्यांना धुण्याची व पोहून काढण्यासाठी भरपूर पाण्याच्या सांठ्याची उणीव भासू लागली. सोनोरी गांवचे पूर्वेस मोहनदरा या नांवचे मोठे शिवार डोंगराच्या पायथ्याशीं आहे. तेथील शेतकरी लोकांस व त्यांच्या जनावरास पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे, त्यांनी महिपतराव लक्ष्मण व रामराव लक्ष्मण पानसे, यांस विनंती केली की, गांवच्या सोनवणी नांवाच्या बळांत आम्हांस एक तळे बांधून द्यावे. ही गोष्ट पानसे यांनी ताबडतोब कबूल केली व त्याप्रमाणे एक मोठे चिरेबंदी अष्टपैलू तळे बांधिले. त्याची प्रत्येक वाजू सत्तर फूट लांब आहे. तळ पक्या मळ्या खडकापर्यंत खोदला असून तो उतरता असल्यामुळे त्यांत पाणी सहाफुटांपासून वीस फूट खोलीपर्यंत राहते. तळे बांधल्यावर त्याचे कांठीं चार बिघे जमीन समस्त थळक यांनी पानसे यांस बागबगीचा व फुलझाडे यासाठीं इनाम करून दिली. हे तळे शके १६९१ साली बांधिलं. तळ्यावर गुराढोरांस व माणसांस पाणी पिण्याशिवाय इतर कोणताही हक्क गांवक-यास दिला नाही. अशा रीतीनें पानशांनी हे तळे बांधून स्वार्थ आणि परमार्थ साधिला. मोकाशाचा वाडाः- पानगांवकर पानसे घराण्यास सोनोरी येथील मोकासपणाबद्दल सध्या इंग्रज सरकारांतून नक्त रक्कम मिळते. त्यामुळे या शाखेतील पुरुषांना सोनोरीस मोकाशी या नांवाने ओळखतात. यांनी सोनोरीस एक वाडा बांधिला आहे, त्यास मोकाशाचा वाडा म्हणतात. हा वाडा शके १६९० च्या सुमारास शिवाजी खंडेराव पानसे यांनी बांधिला असावा. हल्ली वाडा नाहीसा झाला असून भोंवतालचा ८।१० फूट उंचीचा दगडी तट उभा आहे. तटाने सुमारे दीड एकर जागा व्यापिली आहे. आंत एक वांधीव दगडी विहीर, एक तुळशीवृंदावन व एक तळघर आहे. तळघरांत पैसा सांठविलेला आहे अशा समजुतीने वाड्याच्या पुढील वंशजांनी त्याची पाडापाड पुष्कळ केली, पण पैका हाती लागला नाहीं ! या वाड्याजवळ एक उक्म नक्षीचे व घडीव दगडाचे सांभाचे देऊळ मोकाशांनीच बांधलेले आहे. देवळालगत. एक चिरेबंदी दगडाची पाय विहीर बांधली असून तिच्या आंत औंवरी काढून १०।१२ ब्राह्मण स्नानसंध्येस बसतील अशी सोय केली आहे. विहिरीच्या पाण्याचा पिण्यापुरता हक्क गांवास देऊन त्याऐवजी गांवांतील रयते कडून विहिरीलगत चार बिघे जमीन देवाचे फुलझाडाकरितां इनाम करून घेतली आहे. त्यांत पूर्वी सुंदर बगीचा होता; परंतु हल्ली तो नाहीसा झाला आहे. वाडा बांधल्यानंतर एक दोन वर्षातच ही विहीर व देऊळ हीं बांधली असावीं. वाड्यास, विहिरीस व देवळास खर्च किती झाला. या बद्दल नक्की माहिती मिळत नाही. मुरलीधराचे देऊळः- हैं देऊळ व त्यांतील मूर्ति ह्या सोनोरसि प्रेक्षणीय वस्तू तील अपूर्व वस्तु होत. मूर्ति पाहणाराचे चित्त अत्यंत आनंदित होते. हे देऊळ