पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दहावे... १३१ तून वर चढून येण्यास प्रतिबंध करण्यासाठी पिलाजीराव जाधव यास नेमिले होते. यांनीं घाटाच्या माथ्यावर एक किल्लेवजा मोठा वाडा बांधून त्यांत ते राहून शत्रुसैन्याचा मार्ग अडवीत होते. हा वाडा हल्ली कायम आहे. डोंगराच्या उत्तरेकडील भाग भिंतीसारखा दोन हजार फूट उंचीचा असल्यामुळे व ह्या भागावर पुरंदर किल्लयांतून मारा होण्यासारखा नाही म्हणून शत्रूस आपल्या सैन्यासह या ठिकाणी राहून योग्य संधीची वाट पहात बसण्यासारखी आश्रयाची ही जागा आहे. या जागेवर आश्रय घेण्याची संधि शत्रूस मिळू नये म्हणून पानशांनी विचार करून या ठिकाणी हा किल्ला बांधला. हल्ली किल्लयाचा तट जागजागी पडून नादुरुस्त झाला आहे. अलीकडे चोरटे लोकांस लपून बसण्यास हा किल्ला ही चांगली जागा झाली आहे. उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांचे वंडाचे वेळी बंडखोर लोक, या किल्लयाचे आश्रयाने रहात होते. मिलिटरी लोकांची त्यांचे मार्गे सारखी दौड असल्याने गांवक-यांस त्या वेळी फार त्रास झाला. किल्ला बांधल्यापासून त्यावर म्ह्णण्यासारखी मोठी वास्त झाली नाही. मात्र पेशवे सरकारांनी शिबंदी ठेवण्यासाठी वार्षिक तीन हजारांची नेमणूक पानशांस करून दिली होती असा कागदोपत्री उल्लेख आढळतो. किल्ला बांधिल्यानंतर कर्नाटकांतील स्वायांत पानसे गुंतल्यामुळे व तदनंतर लवकर च पेशवाई नष्ट झाल्यामुळे पानशांचे पुढील बेत जागचेजागी राहिले. किल्ला बांधण्यास किती खर्च आला याचा दाखला सांपडत नाही. भिवकुंड:--भिवराव पानसे हे सोनोरीस शके १७०० त फाल्गुन वद्य पछि सोमवारीं वारले. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी सौ. उमाबाई यांनी सहगमन केले. त्यांच्या दहनभूमीवर भिवराव यांची समाधि व उमाबाई यांचे तुळशीवृंदावन बांधलें। आहे. लगत च कुंडाकृति चारी बाजूंनी पायच्या असलेली एक विहीर बांधली आहे व तिला भिवकुंड असे नांव दिले आहे. समाधि, तुळशीवृंदावन व कुंड ही हल्ली उत्तम स्थितीत आहेत. कुंडास जिवंत पाण्याचे झरे असून त्याचे पाणी वारा महिने टिकते. समाधीच्या व वृंदावनाच्या नित्यपूजेसाठी कुलोपाध्याय घोडे यास भोंवतालची चार बिघ जमीन इनाम दिली आहे. त्यांत आंब्याची, नारळीची व सुपारीची झाडे असून केळीचा हि वाग होता. हे आमच्या लहानपणीं पहाण्यांत आहे. परंतु हल्ली तेथे कांहीं नसून जमीन उघडी रखरखीत पडलेली आहे. पूजा वगैरे आज कांहीं होत नसन समाधीसभोंवतीं गवत व कांटेरी झाडे उगवलेली आहेत. लग्नमुंजीच्या शुभ कार्यारंभीं समाधीजवळ जाऊन अक्षत देण्याची पद्धत आजपर्यंत चालू आहे. परंतु या प्रसंगीं कांटेकुंपणांतून मोठ्या कष्टाने समाधीपर्यंत जावे लागते. ही स्थिति पाहून त्या पवित्र मृतात्म्यास आपल्या वंशजांबद्दल काय वाटत असेल बरें ? पानसे मंडळींनी या बाबतींत लक्ष्य घालून आपल्या वडिलांचे अनृणि होणे जरूर नाहीं काय ?

  • ,,