पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० पानसे घराण्याचा इतिहास, लेल्या मूर्तीची स्थापना केली गेली. जुनी भंगलेली मूर्ति रामतीर्थात टाकली आहे व ती अद्याप कुंडाचे तळाशी पडलेली आहे. किल्लाः-- सह्याद्रीचा जो एक फांटा पुरंदर किल्लयाच्या उत्तरेस पूर्वपश्चिम पसरला आहे, त्यावर दिवे घाटाच्या पूर्वेस सुमारे तीन मैलांवर एका सुळक्यावर हा किल्ला माधवराव कृष्ण व भिवराव यशवंत पानसे यांनी बांधिला आहे. हा सोनोरी गांवचे हद्दीत असून गांवचे उत्तरेस सुमारे दीड मैलावर आहे. या कामास शके १६८५ मध्ये सुरुवात होऊन पुढे तो दोन वर्षांनी पुरा झाला. या डोंगराचे उत्तरेस पायथ्याशी सदर्न मराठा रेल्वेवरील आळंदी स्टेशन आहे. किल्लयास दुहेरी तट असून प्रत्येक तटास, हत्ती जातील असे मोठाले दरवाजे आहेत. यांशिवाय आंत जाण्यास आणखी चोरवाटा आहेत. आंतील तटाचे आवारास बालेकिल्ला म्हणतात. तटाचा पाया खोदीत असतां एके ठिकाणी रक्त वाहू लागले, तेव्हां त्या ठिकाणी मल्हारीचे वास्तव्य आहे, असे समजून पानशांनी त्याची प्रार्थना केली की, किल्लयास मी आपलें नांव देईन. प्रार्थना पुरी होतां च रक्त वाहाणे बंद झाले. पुढे या प्रार्थनेप्रमाणे मल्हारीची स्थापना करून किल्यास मल्हारगड असे नांव दिले. किल्लयांत एक मल्हारीचे व एक महादेवाचे अशी दोन देवळे आहेत. पाण्याच्या सोईसाठी किल्लयांत एक माठीव दगडांनी बांधलेले टाकें व तीन विहिरी आहेत. त्यांचे पाणी कधी आटत नाहनं. मल्हारी व शंकर यांची ही दोन्ही देवळे माळीव दगडांनी बांधलेली । असून, त्यांस उत्तम नकशीदार शिखरे आहेत. मल्हारीची मूर्ति घोड्यावर म्हाळसेसह वसलेली काळ्या पाषाणाची आहे. महादेवाचे देवालयांत शाळुका व पिंडी यांची स्थापना केलेली आहे. देवालयासभोंवतीं विल्ववृक्षांची झाडे लाविली असून ती आज कायम आहेत. किल्लयाचा बाहेरील तट तेरा फूट उंच व सहा फूट रुंद असून आंतील पांच फूट उंच व तितकाच रुंद आहे. बाहेरील तटाचा घेर ७०० यार्ड आहे. पुरंदर व मल्हारगड या दोन किल्लयांमध्ये सुमारे पंधरा सोळा मैलांचे अंतर आहे. या दोन किल्लयांमधील प्रदेश सपाटीचा असल्यामुळे शत्रूस छपून रहाण्यास जागा नाहीं. पुरंदर किल्लयाची उंची समुद्रसपाटीपासून ४९०० फूट आहे व मल्हारगडची ३३०० फूट आहे. किल्लयाचे उत्तर बाजूस डोंगराचा भाग भिंतीसारखा खोल असून ती खेली २००० फूट आहे व याच भिंतीसारख्या उभ्या असलेल्या भागाच्या पायथ्याशी आळंदी रेल्वे स्टेशन आहे. पुरंदर किल्ला हा फार जुना व मजबुतीचे ठिकाण म्हणून शिवाजी महाराजांपासून पेशवाईच्या अखेरीपर्यंत या किल्लयाचे फार महत्त्व होते. या किल्लयावर शत्रूचा नेहमी डोळा असे. किल्लयावर चढाई करून जाण्यास दिवेघाटाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. कारण पाश्चम बाजूस सह्याद्रीची ओळ असुन त्यावर जागजागी किल्ले बांधून शत्रूचा मार्ग त्या बाजूनी अडविला होता. दिवे घाट