पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण में १२९ लक्ष्मीनारायणाचे देऊळः–यांतील मूर्ति स्फटिकाची असून फार सुंदर आहे. प्रथम सिंहासन, त्यावर शेष, शेषावर गरूड व गरुडाचे खांद्यावर नारायण आरूढ झाले असून, त्यांनीं कटीवर लक्ष्मीस घेतले आहे, अशी या मूर्तीची रचना आहे. मुख्य देवळाच्या चारही कोप-यांवर चार लहान देवळे बांधली असून त्यांत देवी, सूर्य, गणपति व महादेव यांची स्थापना केली आहे. सारांश हीं पांच देवळे मिळून एक विष्णुपंचायतन झाले आहे. मुख्य देऊळ व सभामंडप दगडी बांधला असून मंडपाच्या तिन्ही बाजूनी कमानी आहेत. लक्ष्मीनारायणाची मूर्तीि मूळची कर्नाटकांतून आणली अशी माहिती मागे आलेली च आहे. मूर्तीबरोबर आणलेले चंदनाचे खांब सासवड येथील श्रीसोपानदेवाच्या देवालयास, त्याच्या जीर्णोद्धाराच्या वेळी पानशांनी दिले वगैरे हकीकत मागे येऊन गेली च आहे. या मूर्तीसंबंधाने अशी एक दंतकथा सांगण्यांत येते की, या मूर्तीची भक्तिभावानें सेवा करणारा एक वैरागी होता. तो मूर्तीच्या मागोमाग कर्नाटकांतून सोनोरीस आला; व मूर्ति परत मिळविण्यासाठी त्याने पुष्कळ खटपट केली; पण ती व्यर्थ झाल्यावर त्याने वाड्याच्या मोठ्या दरवाज्यांत धरणे धरून शरीरत्याग केला. त्याच्या आत्म्याच्या शांत्यर्थ तेव्हांपासून आजपर्यंत दर सणावारी त्याच्या प्राणोत्क्रमणाच्या जागी त्याची पूजा करून त्यास नैवेद्य अर्पण करण्याची चाल प्रचलित आहे. यावरून या दंतकथेत सय असावे असे वाटते. देवळाचे आवारांत एक विहीर आहे. पूर्वी तिच्या पाण्याचा उपयोग करून देवळाच्या आवारांत एक फूलझाडांचा बगीचा केला होता. आतां तो नाहीसा झाला असून, त्यांत फक्त बकूळ, व अशोक यांचे वृक्ष आज शिल्लक राहिले आहेत. विठोबा व रामचंद्र यांची देवळेः--हीं देवळे वाड्याच्या बाहेर पश्चिम दरवाजाजवळ तटाशेजारी एकाच चबुत्र्यावर आहेत. एका देवळांत श्रीविठोबारखुमाई व दुस-यांत श्रीरामचंद्र, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ति आहेत. दोन्ही देवळांस सभामंडप एक च असून, त्यांस विटांच्या कमानीच्या भिंती आहेत, व मंडपास चुनेगची आच्छादन आहे. विठोबासमोर गरूड व रामचंद्रजीचे समोर मारुति यांची लहान लहान देवळे आहेत. विठ्ठलरखुमाईच्या मूर्ति काळ्या दगडाच्या व राम, सीता, लक्ष्मण यांच्या पांढ-या दगडाच्या आहेत. देवळाच्या आवारांत चारी बाजूंनी दगडी पायच्या असलेली कुंडाकृति एक मोठी विहीर आहे. तीस * रामतीर्थ " असे म्हणतात. त्यांतील पाणी बारा महिने कायम टिकत असल्यामुळे, मोटेची व्यवस्था करून देवळाचे आवारांत फुलझाडांचा सुंदर बगीचा केलेला होता; आम्हीं तो प्रत्यक्ष पाहिला आहे. सांप्रत तेथे नुसती रखरखीत जमीन आहे. ही देवळे वाडा बांधून झाल्यानंतर, पुढे पांच सात वर्षांत बांधली गेली असावी. देवाच्या पूजे-अर्चेसाठी पेशवे सरकारांनी वनपुरी हा गांव पानशांस वंशपरंपरेनें इनाम करून दिला व तो अद्याप पानसे घराण्याकडे चालत आहे. वनपुरी हा गांव सोनोरीच्या आग्नेयीस एक कोसावर आहे. मूळची रामाची मूर्ति भंगली म्हणून शके १७४७ सालांत हल्लीं अस