पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दहावे. १२७ कसदार नसल्यामुळे येथील शेतकरी लोकांचे बागाइती पीक करण्याकडे ज्यास्त लक्ष आहे; यामुळे प्रत्येक गांवीं सुमारे दीडशेंवर विहिरी खोदिल्या आहेत. तरी सुद्धा अलीकडे दहा पंधरा वर्षांत भरपूर पाऊस पडत नसल्यामुळे बागाइती विहिरीस पाण्याचा पुरवठा भरपूर नाहीं, सबब पावसाळ्यानंतरच्या आठ महिन्यांत शेतक-यांना पोटासाठी पुणे-मुंबई पाहावी लागते. - सोनोरीची व दिव्याची हवा चांगली असून उन्हाळ्यांत पारा १०५-१०६ अंशांचेवर जात नाही. पावसाचे मान २४ इंचांपर्यंत असते; परंतु गेल्या दहा बारा वर्षांत तें निम्यावर येऊन बसले आहे. गांव रहदारीच्या रस्त्यापासून दूर व डोंगराच्या खोल्यांत वसला असल्याने सांथीचे रोग सहसा होत नाहींत.. आतांपर्यंत फक्त एकदाच प्लेगचा प्रादुर्भाव येथे झाला व तो हि परगांवचे पच्छाडलेले रोगी येऊन त्यांच्या संस • गाने झाला. - गांवास एक ओढा आहे; चांगला पाऊस पडला तर त्यांचे पाणी चैत्रापर्यंत टिकते, त्यामुळे गांवांत घरोघर विहिरी असून त्यांना ४०।५० फुटांवर कायमचे पाणी लागते; व ते बारा महिने कायम टिकते. विहिरीच्या तळांत ३०-३५ फुटांपर्यंत काळा व कडक पाषाण फोडावा लागतो. सर्व विहिरी गोड्या पाण्याच्या असून त्यांतील पाणी स्वच्छ, रुचकर व पाचक असे आहे. शुद्ध हवा आणि विपुल व पौष्टिक पाण्याचा भरपूर पुरवठा असल्याने कित्येक वेळां सासवड येथील दिवाणी कोर्ट सोनोरीस आलेले आहे. गांवांतील देवळे, वाडे वगैरे मुबलक जागेमुळे कोर्टाचा पसारा येथे सहज समाचला जातो. सोनोरी हा गांव श्रीमंत माधवराव नारायणराव पेशवे यांनी शके १७०४ मध्ये जयवंतराव यशवंत पानसे यांस त्यांची व त्यांच्या पूर्वजांची स्वामिसेवा मनांत आणून त्यांच्या मातोश्रीच्या क्षेम-कल्याणासाठीं वंशपरंपरेनें इनाम करून दिला. तो अद्यापि • त्यांच्या वंशजांकडे चालू आहे. गांवची लोकसंख्या इ. स. १९०१ मध्ये ९०२, १९११ त ९७८ व १९२१ मध्ये ७४८ होती. जी लोक संख्या कमी झाली ती मुख्यत्वे ब्राह्मण व बेकार शेतकरी यांची आहे. भाऊबंदकीच्या वांटण्यामुळे जमीन-जुमला विभागला गेला. त्यामुळे निर्वाहाचे साधन कमी झाले. शिवाय मुलांच्या शिक्षणाच्या सोईसाठी ब्राह्मण मंडळीस पुणे मुंबईकडे बाहेर जाणे भाग झाले. त्यामुळे सोनोरीची वस्ती कमी होऊन जुने मोठमोठे वाडे रिकामे पडले आहेत. पानशांनीं सोनोरीस वस्ति केल्यावर जसजसी त्यांची भरभराट झाली, तस तशी - त्यांनी तेथे इमारती देवळे वगैरे बांधून गांवास शोभा आणली. पहिल्याने राहाण्यासाठीं वाडा बांधला. नंतर शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी जवळ च डोंगरावर माव्याचे ठिकाण पाहून किल्ला बांधला आणि मग सुखस्वास्थ्य पूर्ण लाभल्यावर गणपति. विठोबा, रामचंद्र यांची देवळे हि बांधिली. या देवळांतील देवांच्या पूजे-अर्चेसाठी