पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ पानसे घराण्याचा इतिहास पेशव्यांकडून त्यांनी इनाम गांवे मिळवून देवांची व्यवस्था लावून दिली. ती अद्याप सुरळीत चालू आहे. वाडाः—हा गांवच्या ईशान्य कोप-यास असून किल्लयासारख्या मजबूत तटाने वेष्टित असा बांधला आहे. त्याची लांबी दाक्षणोत्तर ३८० व पूर्वपश्चिम ३२५ फूट आहे. तटाची जाडी नऊ फूट असून उंची १९ फूट आहे. शिपायास पहारा करण्यासाठी तटावर चौफेर रस्ता आहे, व वंदुकांच्या माच्यासाठी त्याला जंग्या हि ठेविल्या आहेत. बाहेरून आंतला माणूस दिसू नये म्हणून दर्शनी बाजूस सहा फूट उंच तट बांधिला आहे. वाड्यास अंबारी सह हत्ती आंत येतील असे दोन मोठे दरवाजे आहेत. दरवाज्याच्या झडपास मोठमोठे लोखंडी कांटे बसविले आहेत. वाड्याचा मुख्य दरवाजा पूर्वेस व दुसरा पश्चिमेस आहे. वाड्यास चारी कोप-यास चार व पश्चिम दरवाज्याच्या बाजूस दोन मिळून सहा बुरूज आहेत. साधारणपणे पुणे येथील शनवार वाड्यासारखी तटाची व दरवाज्यांची बांधणी आहे. वाड्याच्या आंत, सांप्रत, भाऊबंदकीमुळे चार वांटण्या होऊन चार वाडे झाले आहेत व त्यामुळे वाड्याचे मूळचे रूप पालटून गेले आहे. मधून मधून हत्तीघोड्यांच्या पागा, मोठमोठ्या चौकांचीं जाता, पडक्या भिंती व आंतील कारंजीं हीं पूर्वीची वैभव दाखविणारी अवशिष्ट चिन्हें आढळतात. पिवळा चौक, हिरवा चौक, माणिक चौक अशी चौकांस निरनिराळी नांवें होती असे सांगतात. पूर्वी, वाड्याच्या पूर्व दरवाज्याबाहेर ब्राह्मण वस्ति होती, तिच्या खुणा ( जोती, भिंती, विहिरी वगैरे ) अद्यापि दिसतात. या भागांत कांहीं पिशाचबाधा झाल्याने तेथून ही वस्ती उठून पश्चिम दरवाज्याकडे गेली, ती सध्यां तिकडे च कायम झाली आहे. पश्चिम दरवाज्यालगत, हल्ली मुरलीधराचे देऊळ, मोकाशाचा वाडा व महादेवाचे देऊळ ही आहेत. त्या जागेतून पूर्वी ओढा वाहात होता, तो पश्चिमेस हटवून त्या जागेवर हीं वरील देवळे व ब्राह्मण वस्ति वसली आहे. या नव्या वस्तीस खुद्द पेशव्यांनीं व पानशांनीं आर्थिक मदत केल्याचा दाखला सांपडतो. वाड्यास खर्च किती आला व त्याचे काम पूर्ण केव्हां झालें वगैरे माहिती अद्यापि मिळाली नाहीं. तथापि तो शके १६८२ ते १६८४ या दरम्यान बांधला गेला असावा असे वाटते. हल्ली सर्व वापर वाड्याच्या पश्चिम दरवाज्याने होतो, त्यामुळे तो च मुख्य दरवाजा अशी चुकीची समजूत झाली आहे, पण मुख्य दरवाजा पूर्वेचा च होय. वाड्यांत एक गणपतीचे व दुसरं लक्ष्मीनारायणाचे अशी दोन देवळे आहेत. | गणपतीचे देऊळः-हे देऊळ लहान असून वाड्याच्या पूर्व दरवाज्या शेजारी उजव्या बाजूस आहे. वाड्यांत पानशांची स्वारी शिरण्यापूर्वी पहिल्याने विघ्नहर्त्या गणपतीचे दर्शन घेऊन नंतर दरवाज्यांतून वाड्यांत यावे अशा योजनेनें हैं देऊळ बांधलेले आहे.