पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ पानसे घराण्याचा इतिहास. रक्त येऊ लागले. हे पहातांच बादशहा फार घाबरून गेला व केलेल्या कृत्याबद्दल देवाची प्रार्थना करून त्याने क्षमेची याचना केली. पुढे त्याने दगडी देवालय बांधून त्यांत नवीन शिवलिंगाची स्थापना केली व देवाच्या खर्चासाठी जमिनी इनाम करून दिल्या. आज जें शिवलिंग दिसते ते हें बादशहाने स्थापिलेले असून मूळ लिंग त्या खालीं आहे. वादशहाने इनाम दिलेल्या जमिनी अद्यापि या घोडे घराण्याकडे चालू आहेत. या घराण्यांतील कोणा पुरुषाने व केव्हां सोनोरीस जाऊन पानशांचे उपाध्येपण मिळविले ते समजत नाहीं. पानशांनी त्यांच्या योगक्षेमार्थ वेळोवेळीं इनाम जमिनी दिल्या, त्या अद्यापि त्यांच्याकडेस चालू आहेत. ब्रह्मे:-हे ऋग्वेद देशस्थ ब्राह्मण, खेड तालुक्यांतील चाकणचे रहिवाशी. शंकरभट व रामभट ब्रह्मे हे दोघे बंधु चांगले विद्वान व वैदिक कर्मात पारंगत असे होते. या दोघांचा मुक्काम वांई येथे असतां, त्यांची व जयवंतराव यशवंत पानसे यांची गांठ ' पडली. जयवंतरावांनी आग्नहोत्र घेतले होते. त्यांनी या दोघा भावांची विद्वत्ता पाहून त्यांस सोनोरीस आपल्या आश्रयास आणले. त्या दिवसापासून म्हणजे सुमारे दीडशें वर्षांपासून हे सोनोरीस कायमचे राहू लागले. पुढे यांच्या चरितार्थासाठी पानशांनी निरानराळ्या प्रसंगी त्यांना जमिनी इनाम करून दिल्या. शके १६९९ सालीं कृष्णराव माधव यांच्या उत्तरकार्यनिमिक्त पांच विघे व शके १७१९ साली श्रीपतराव दामोदर यांचे उत्तरकायकरितां तीन बिघे मिळून एकंदर आठ बिघे जमीन सोनोरी गांवच्या हद्दत, गोपाळ बागेपैकीं, इनाम करून दिली. तसेच शके १७२९ सालीं पुंडलिकराव गोपाळ व शके १७३८ त उमाबाई भ्रतार भिवराव यशवंत, यांच्या उत्तरकायनामित्त अनुक्रमें पांच व तेरा मिळून अठरा बिघे जमीन दिवे गांवचे हद्दीत इनाम करून दिली. या सर्व इनाम जमिनी ब्रह्मे यांच्या वंशजाकडे हल्ली चालू आहेत. याशिवाय सोनोरी गांवा:जवळ असलेल्या चार पांच गांवांतील कुलोपाध्यायाच्या वृत्त्या हि यांनी संपादन केल्या आहेत. सोनोरी हा गांव डोंगरालगत वसला असल्याने गांवच्या जमिनीपैकी निम्मे अधिक जमीन मुरमाळ असून बाकीची मध्यम प्रतीची आहे. दिवें व सोनोरी ही दोन्ही -गांवें पूर्वी विड्याच्या पानाविषयीं व अंजिराविषयी प्रसिद्ध होती. परंतु अलीकडे सुमारे १५-२० वर्षांत पावसाच्या दुर्भिक्ष्यामुळे पानमळे नाहीसे झाले. अंजिराचे बाग मात्र थोडे फार शिल्लकआहेत. अंजीर फार उत्तम प्रतीचा पिकतो. या भागांतील दिवे, सोनोरी, वनपुरी गु-होळी, उरूळी, अंबोडी वगैरे गांवांत जसा उत्तम अंजीर होतो, तसा इतरत्र होत नाहीं. कारण इकडील जमीन, हवा व पाणी या पिकास फार पोषक आहे. हल्ली संत्र्यामोसंब्यांचे पीक काढण्याकडे लोकांचे लक्ष असल्याने त्यांची लागवड दिवें व सोनोरी येथे वाढत आहे; तसेच डाळिंबाच्या बागांची हि आवड लोकांत उत्पन्न झाली आहे: -दोन्ही गांवांत बाजरी हे मुख्य पीक असून मूग, उडीद वगैरे दुय्यम पीक होते. जमीन