पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दहावें. .. . . . ..... . . । स्थलवर्णन. या प्रकरणांत पानसे घराण्याने जेथे जेथे कांहीं इमारती, किल्ले, घरठाण वगैरे बांधले व वस्ति केली, त्या त्या ठिकाणांची माहिती देण्याचे योजिले आहे. त्यांत प्रथम सोनोरी गांवाची व तेथील इमारतींची माहिती देतो. १. सोनोरी. मौजे सोनोरी ऊर्फ सोनौरी ( सोनपुरी ) हैं गांव हल्लीं पुणे जिल्ह्यांत पुरंदर तालुक्यांत आहे. येथून पश्चिमेस सुमारे एका कोसावर दिवे हा गांव आहे. दिवे घाट हा सह्याद्रीच्या ज्या फांट्यावर आहे, त्याच फांट्याच्या पायथ्याशी दिवे घाटापासून पूर्वेस दीड कोसावर सोनोरी गांव आहे. गांवालगत उत्तरेस अर्ध्या कोसावर डोंगराच्या । एका सुळक्यावर मल्हारगड हा किल्ला आहे. डोंगराच्या अर्धचंद्राकृति खोयांत गांव वसले आहे, त्यामुळे जवळ जाईपर्यंत गांव दिसत नाहीं. गांवांत बहिरोबा, मारुति व । महादेव अशी तीन जुनाट देवळे आहेत. हीं व दिवे येथील कातोवाचे देऊळ अशीं सर्व एका च वेळी बांधलेली आहेत. त्यावरून ही दोन्ही गांवें बरीं च जुनाट वसलेली असावी असे दिसते. वरील जुनाट देवळांखेरीज विठोवा, रामचंद्र, गणपति, महादेव, देवी वगैरे देवांची हि देवळे आहेत. मात्र, ती अर्वाचीन आहेत. या ( व दिवें ) : गांवच्या ज्योतिषकुळकरणाच्या वृत्ति मागे सांगितल्याप्रमाणे मूळ गिधवे यांच्या होत्या; त्या त्यांनी आपले जावई पानसे यांस आंदण दिल्या; त्या अव्याहत आजपर्यंत पानशांकडे चालत आहेत. आणि तेव्हांपासून पानशांची या ( व दिवे ) गांवांत कायमची। वस्त झाली आहे. हल्ली पानशांच्याखेरीज गांवांत घोडे व ब्रह्मे या आडनांवांचीं। आणखी ब्राह्मण घराणी आहेत. याशिवाय इतर वास्ति शेतक-यांची आहे. त्यांत * काळे' या आडनांवाच्या मराठे कुणब्यांची घरे जास्त आहेत. सोनोरीची पाटीलकी या काळ्यांपैकी एका घराण्यांत चालू आहे. घोडेः—हे पानसे यांचे कुलोपाध्याय आहेत. यांचे मूळ पुरुष अनंत भट हे, पुणे शहर वसण्यापूर्वी पुणे-वाडींत म्हणजे हल्लीच्या कसबा पेठेतील केदारेश्वराच्या देवळाच्या जागेत एक खोपटी बांधून त्यांत राहून केदारेश्वर महादेवाची उपासना करीत असत. त्या वेळीं पुणेवाडीवर मुसलमानी अंमल होता. त्या मुसलमान बादशहाचा कारभारी ब्राह्मण जातीचा होता. त्याची केदारेश्वरावर विशेष भक्ति होती. बादशहास ती त्याची हिंदु देवतेवरील भक्ति सहन न होऊन त्याने एके दिवशीं बळजबरीने देवळांत शिरून आपल्या हातांतील तलवारीने शिवलिंगास वार केला, तेव्हां पिंडीतून