पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ पानसे घराण्याचा इतिहास. म्हणणे, हे भाऊबंद नामदेवभटांचे सीधे वंशज नाहींत, तेव्हां त्यांचा हक्क वतनावर नाही. त्यामुळे हा तंटा श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्याकडे गेला. तेथे आपसांत तडजोड होऊन भोळी व तोंडल या गांवच्या वतनांत नामदेव भटांचे भाऊबंदास पानशांनी निम्मे वांटणी दिली. सांप्रत भोळी गांवांत' या नामदेव भटाच्या भाऊबंदांचे वंशज विद्यमान असून त्यांना आतां खडके या नांवांने तेथे कोणी न ओळखतां पानसे याच नांवाने ओळखतात. वरील पांच हि गांवें नीरा नदीच्या काठावर मैल दोन मैलांच्या अंतरावर असून शिरवळाहून महाबळेश्वराकडे जी सरकारी सडक जाते तिच्यालगत आहेत. वाठार येथे पानशांचा एक मोठा वाडा आहे. तो बाबूराव सखाजी यांनी बांधला. वडगांवकर पोतनीस हे बाबूरावाचे मामा. पोतनीसांनी ज्या वेळी वडगांवी आपल्यासाठी एक वाडा बांधला; त्यावेळी जें सामान शिल्लक राहिले ते त्यांनी बाबूरावास दिले व त्या सामानाने बाबूराव याने हा वाडा बांधला असे सांगतात. । सदर पांच गांवे मावळालगत असल्याने त्यांत मावळी पीक होते. म्हणजे विशेषतः भात पिकते. याखेरीज बाजरी, मूग, वाटाणा ही धान्ये हि होतात. आंबे व केळी यांच्या बागा हि या गांवांत आहेत. दरेक गांवाची वस्ति साधारण हजार वाराशाचे आंत आहे. पाऊसपाणी भरपूर असल्याने पीक उत्तम येते व त्यामुळे गांवांत सुबत्ता असून लोक सुखी आहेत. - या गांवांच्या संबंधी पुढील माहिती लक्षात ठेवण्यासारखी आहे. वाठार नांवाची दोन गांवे असून, त्यांपैकीं वाठार बुद्रुक ( चोराचे ) हे प्रसिद्ध असून ते वाई तालुक्यांत आहे व दुसरें वाठार खुर्द जवळ च सचिवांच्या हद्दीत विचित्रगड तालुक्यांत आहे. त्याचप्रमाणे तोंडल नांवाचीं गांवे हि दोन आहेत. पैकी एक पुरंदर तालुक्यांत व दुसरें. वरीलप्रमाणे विचित्रगड तालुक्यांत आहे. या दरेक गांवाची लोकसंख्या सुमारे सहा सात शें असून प्रत्येक गांवीं एक ब्राह्मणाचे घर आहे व ते पानशांचे च आहे. वाठारकर पानशांचे कुलोपाध्याय वीर येथील रहिवासी खिरे आडनांवाचे आहेत. भोळी, तोंडल व लोणी येथील, पानशांचे कुलोपाध्याय थिटे आडनांवाचे आहेत. सोनोरी येथील पानसे यांचे उपाध्ये घोडे यांनी च या कुलोपाध्यायांच्या नेमणुका करून दिलेल्या आहेत. ० % . . .