पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण नवर्वे. १२३ सबंध वृत्तीची मागणी न करता ते निम्या वृत्तीच्या मालकीबद्दल तंटा करू लागले. हा वाद साता-यास श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्याकडे गेला. पण त्यांना मोहमेवर जावयाचे असल्याने त्यांनी हा वाद छत्रपति रामराजे यांच्याकडे पाठविला. या वेळी, पानशांनी सांगितले की, * भोळी, तोंडल, गुणंद ( परगणे शिरवळ ) व लोणी, तोंडल ( प्रांत पुणे ) हीं पांच गांवे आमची पुरातन मिरासी ( ज्योतिष-कुळकरणाच्या वृत्तीची ) आहेत. फार पूर्वी शिरवळ परगण्यांतील तीन गांवांबद्दल भवाळ यांनी आमच्या विरुद्ध तंटा उपास्थित केला. त्याचा निकाल मोहरी गांवीं तेथील देशपांडे यांचे समोर दिव्य होऊन आमच्या सारखा होऊन आमचे पूर्वज भुतो परशराम खरे. झाले. त्या नंतर पुन्हा शिरवळचे परभुणे यांनी याच गांवाबद्दल वाद चालविला. तेव्हां मौजे वाटेगांव प्रांत बत्तीस शिराळे येथे दिव्य होऊन साबाजी बापदेव पानसे हे खरे झाले व त्यांच्यासारखा निकाल झाला. त्या वेळी या प्रांताचा मोकासा गणोजीराव निंबाळकर यांचेकडे होता व परभुणे हे त्यांचे पदरी नौकर होते. त्यामुळे आपल्या विरूद्ध निकाल झाला असतां हि परभुण्यांनी निंबाळकर यांचे वशिल्याचे जोरावर बळजबरीने वरील तिन्ही गांवांचा भोगवटा चालविला. तेव्हां जिवाजी साबाजी, कान्हो केशव, खंडो शिवदेव व माधवराव लक्ष्मण या पानसे मंडळीनी यादो रघुनाथ व नारो यादव परभुणे यांच्या विरुद्ध सरकारकडे तक्रार नेली. तेव्हां तत्कालीन नियमाप्रमाणे त्रिपुटचा कुलकर्णी नरहर विश्वनाथ यांस पानशांच्या तर्फे व जान बल्लाळ वाघ अहिरेकर यास परभुण्यातर्फे जामीन घेतले आणि पंचाकडे वाद तोडण्यास दिला. त्यांत मल्हारपंत पुरंदरे सरपंच होते. पंचांनी शिरवळ येथील केदारेश्वराचे देवळांत दिव्य करावयाचे ठरविले. त्या वेळी असा एक शास्त्रार्थ निघाला की, एकाच घराण्यांतील पुरुषास एकाच बाबींबद्दल दोन वेळा दिव्ये करितां येत नाहीत. सबब पानशांना आतां दिव्य करता येणार नाहीं; कारण, मागं त्यांनी वाटेगांवीं दिव्य केले आहे. पानशांनीं नामदेव भट बिन पन्हंभट खडके या नांवाचे त्यांचे एक स्नेही होते त्यांस पाठिराखे भाऊ करून त्यांच्याकडून आपल्या तर्फे शिरवळास दिव्य करावले. दिव्य करण्यापूर्वी पानसे व नामदेव भट यांच्यांत असा करार ठरला कीं, नामदेव भटाने में दिव्य पानशांसाठी करावें व त्याबद्दल पानशांनीं नामदेव भटास व त्याच्या वंशजास भाऊ मानून भोळी, तोंडल.. लोणी आणि गुणंद या चार गांवच्या ज्योतिष कुलकरणाच्या वृत्तांत निम्मे वांटा द्यावा, नामदेव भटाचे गोत्र हि पानशांप्रमाणे मुद्गलच होते. वरील करार ठरल्यानंतर, शिरवळास शके १६४२ विश्वावसु संवत्सरी चैत्र शुद्ध नवमी मंगळवारी नामदेव भटानें पानशांसाठी दिव्य केले; त्यांत भटजी खरे ठरून परभुणे खौटे झाले. तेव्हां त्या निकालाप्रमाणे सरकारने आपली राजपते हि करून दिली. या प्रसंगानंतर नामदेव भट लवकरच वारले. त्यांस पुत्रसंतति नव्हती म्हणून त्यांचे भाऊबंद उपर्युक्त यादव रघुनाथ वगैरे ह्या वृत्तीवर हक्क सांगू लागले. पानशांचे