पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ पानसे घराण्याचा इतिहास. गुणंद व तोंडल या चार गांवांच्या ज्योतिष-कुळकरणाच्या वृत्त संपादन केल्या आणि आपले वास्तव्य हि त्या गांवीं च केलें. तानाजीस पुढे बालावा, अंताजी व परशुराम असे तीन पुत्र झाले. यांपैकी अंताजी याने वरील चार गांवांशेजारी असलेल्या वाठार. बुद्रुक ( चोराचे ) गांवचे ज्योतिष-कुळकरणपणाचे वतन पूर्वीच्या माणके आडनांवाच्या वतनदारापासून विकत घेतले. हे माणके माणकी गांवचे रहिवासी होते. अंताजीच्या वेळीं या घराण्यांत खालाई नांवाच्या एका वाईकडे या वतनाची मालकी होती. एकदां तिला पैशाची गरज लागली, त्यामुळे शके १५१२ चे सुमारास तिने एकवीस होनांस ही वृत्ति अंताजीस विकत दिली. हें वाठार बुद्रुक ( चोराचे ) सांप्रत कोरेगांव तालुक्यांत आहे. भोळी व लोणी हीं गांवे हि वाई तालुक्यांत आहेत. गुणंद व तोंडल ( गावडे ) ही शिरवळापासून दोन कोसांवर सचिवांचे हद्दीत आहेत आणि तोंडल ( वंजा-याचे ) हे शिरवळाहून दोन कोसांवर पुरंदर तालुक्यांत आहे. सांप्रत, या पांच हि गांवांची वतने पानशांकडे चालू आहेत. याशिवाय सदरहू गांवांत त्यांनी सातारकर छत्रपति, पेशवे व इतर संस्थानिक यांच्यापासून कांहीं; इनामी जमिनी हि मिळविल्या आहेत. मात्र दिवे-सोनोरीकर पानसे घराण्याप्रमाणे या पानसे घराण्याने राजदरबारी कामे केल्याची माहिती आढळत नाही. फक्त अलीकडे वाठार गांवीं रहा णाच्या बाबूराव सखाजी नांवाच्या एका पुरुषाने ग्वाल्हेर संस्थानच्या फौजेत जाऊन नौकरी धरली व पुढे त्यास पंचवीस स्वारांची असामी मिळाली अशी माहिती मिळते. या शाखेतील घराण्यांत ऐतिहासिक कागदपत्रे हि फारशीं मिळाली नाहींत. - | वरील बाबूराव सखाजीच्या वेळी खालाई माणके या बाईच्या भाऊबंदांनी वाठार, लोणी व तोंडल या गांवांच्या ज्योतिष--कुळकरणाच्या वृत्तींबद्दल तंडा उपस्थित केला; पण छत्रपति धाकटे राजाराम यांनी शके १६६५ भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस बाबूरावांच्या बाजूचा निकाल देऊन तसे आज्ञापत्र त्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या नांवाने दिले आहे. या आज्ञापत्रांत या वादासंबंधी पुष्कळ च माहिती आली आहे, तिचा कामापुरता सारांश पुढे देतो. । बाबूराव साबाजी यास जिवाजी साबाजी, कान्हो केशव, खंडो शिवदेव, माधवराव लक्ष्मण व दादाजी नानदेव या भाऊबंदांचे सहाय्य होते आणि प्रतिवादींत यादो रघुनाथ, नारो यादव, व खंडो बापुजी माणके हे भाऊबंद होते. या शके १६६५ मधील भांडणापूर्वी शके १६४२ मध्ये हि हैं भांडण उपस्थित झाले होते. त्यावेळी रत्नाजी बहिरव व केसो राम पानसे हे वादी व यादव रघुनाथ व बापूजी काशी माणके हे प्रतिवादी होते. हा वाद खंडो बल्लाळ चिटणीस यांचे समोर चालून माणके खोटे ठरले; तेव्हां पानशांना तोंडल व लोणी या गांवांच्या वृत्तीबद्दल राजपत्रे करून मिळाली असे असतां माधव रघुनाथ, यादोपंत आणि खंडो बापूजी माणके, हे पुन्हा भांडावयास लागले. शके १६६५ त तोंडल व लोणी या गांवांच्या ज्योतिष--कुळकरणाच्या