पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

|| पानसे-घराण्याचा इतिहास. उत्तरार्ध. प्रकरण नववें.

नीरथडीकर पानसे. । आतांपर्यंत दिवे-सोनोरीकर म्हणजेच तोफखानेवाले पानसे यांची हकीकत आली आहे. आता त्यांच्याखेरीज, पानशांचे दुसरें जें एक घराणे शिरवळ प्रांत जाऊन राहिले त्याची माहिती थोडक्यांत देऊ. या घराण्यास नारधडकर पानसे असे म्हणतात. मागे सांगितलें च आहे की, पानगांव येथून पुणे प्रांतीं जो पानशांचा मूळ पुरुष आला, त्याचे नांव परशुरामपंत ऊर्फ परसावा असे होते. तो वाघ यांच्या घरी लहानाचा मोठा झाल्यावर त्याने पुणे प्रांती जुन्नर, शिरूर व भिमथडी या भागांतील कांहीं गांवांचें ज्योतिष व कुळकरणपण ही वतने मिळविली. त्यास भुतावा नांवाचा एक मुलगा झाला. भुतोपंतास पुढे तीन मुलगे झाले. वडील बालावा, मधला परसावा व धाकटा तानाजी. यांपैकीं तानाजी याने शिरवळ प्रांतीं येऊन भोळी, लोणी, भोळी ( भवाळी ):--हा गांव इतिहासप्रसिद्ध आहे. फलटणच्या गादीवर मुधोजीराव निंबाळकर हे शके १५५१ साली बसले. त्यांस दोन स्त्रिया होत्या. वडील स्त्रीच्या पोटीं बजाजी व सईबाई आणि धाकटीच्या पोटीं साबाजी व जगदेव अशी अपत्यें झाली. सईबाई हिचे लग्न शिवाजी महाराज यांच्याबरोबर शके १५६१ त झाले. साबाजी व जगदेव या दोघा भावांचा विचार आपल्या बापास दूर करून गादी मिळविण्याचा होता. या कामीं साबाजीने विजापूरकरांकडून सैन्याची मदत घेऊन भोळी गांवाजवळ बापावर चाल केली. या लढाईत साबाजीनें बापास पकडून एका वडाच्या झाडाखाली त्यास ठार मारिलें, या वडाचे झाडास पुढे * बाप-मारी व ड ' असे नांव पडले. हा वड सांप्रत अस्तित्वांत नाहीं. मुधोजीरावास ठार केल्यावर आपल्या वडील भावाचा (बजाजी) कांटा दूर करण्यासाठी त्यास पकडून त्याने बादशहाचे स्वाधीन केले. बादशहाने बजाजीस मुसलमानी दीक्षा देऊन मुसलमान करून टाकले. पढे शके १५७३ सालीं बजाजी परत आला व शिवाजी महाराजांस स्वराज्य स्थापनेच्या खटपटींत मदत करू लागला. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई हिने बजाजीस शंभूमहादेवाचे देवळांत देवासमोर प्रायाश्चत्त देऊन हिंदुधर्मात घेतले व या शुद्धीच्या कार्यास जनतेचा पाठिंबा मिळविण्याकरितां बजाजीच्या मुला ( महादजी )- बरोबर आपली नात सखुबाई ( शिवाजीची कन्या ) हिचे लग्न लावून दिले.