पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० पानसे घराण्याचा इतिहास. की, पेशवाईअखेर पानशांकडे १०३७२४ रुपयांचा सरंजाम चालू होता, याशिवाय भिवराव यशवंत, महिपतराव लक्ष्मण व केशवराव लक्ष्मण हे निपुत्रिक वारल्यामुळे त्यांच्याकडे असलेला ७६५८८ रुपयांचा सरंजाम होता; तो पेशवे सरकारांनी पूर्वीच जप्त केला होता. ही यादी समग्र च दिली आहे ( परिशिष्ट क्रमांक ३० पहा ). । पानशांच्या संबंधीं राजकीय बाबतीत आतां फारसे कांहीं लिहावयाचे राहिले नाही. खराज्य असल्याशिवाय स्वातंत्र्य नाही व स्वातंत्र्याशिवाय राष्ट्रांतील व्यक्तीस आपल्या गुणांचा विकास करण्यास वाव सांपडत नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोविल्यापासून पानशांनी आपला त्यांत शिरकाव करून घेतला व सुमारे दीडशे पावणे दोनशे वर्षांच्या काळांत ते आपल्या गुणाने व शौर्याने पुढे आले. शौर्य, मुत्सद्दीपणा, प्रामाणिकपणा, व स्वामिभक्ति हे गुण यांचे अंगीं विशेष प्रामुख्याने वसत असून खच्या क्षत्रियास शोभणारे क्षात्रतेज हि त्यांच्या ठिकाणी प्रखर तेजाने होते. राष्ट्राच्या दुर्दैवाने स्वराज्याचीच इमारत कोसळून पडल्यामुळे राष्ट्रांतील व्यक्तींचे गुण जागचे जाग विराम पावले. जहागिरदार व सरंजामदार यांस एका पिढीत न करितां दोन पिढ्यांत पण जमीनदोस्त करावे, अशा भावनेने ज्या ठिकाणी राज्यकारभाराचे धोरण ठरविले जाते, तेथे पांच पन्नास वर्षांतच, दात पाडलेल्या नागाप्रमाणे, राष्ट्राने नुसती तोंडानेच बडबड करावी, अशी स्थित झाल्यास त्यांत कांहींच नवल नाहीं. = = = = = - पूर्वार्ध समाप्त. , , १, * ,... .: १.३५ .