पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवे. ११९ चालू असलेली रक्कम गोपाळराव व गजाननराव यांना त्यांच्या हयातापर्यंत हिस्सेरशीने मिळेल असा ठराव ता. २० जुलै १८४९ रोजी झाला. त्यानंतर गोपाळराव है। शके १७९९ आषाढ शुद्ध अष्टमीस व गजाननराव इ. स. १८९० साली वारले आणि वरील ठरावान्वयें हें पेनशन त्यांच्या पश्चात् अजिबात बंद करण्यांत आले. पेशवाई नष्ट झाल्यावर इग्रंज सरकारचे राजकीय धोरण ( पोलिटिकल पॉलिसी ) कसे होते हे सांगणे अवश्य आहे. अलपिष्टन याने त्या वेळी दक्षिणेतील सरदारांची व जहागिरदारांची एक यादी केली व त्या यादीत दोन वर्ग पाडले. पहिल्या वर्गात इ. स. १७५१ सालापर्यंत ज्यांना जहागिरी मिळाल्या त्यांचा समावेश केला; व दुस-या वर्गात तदनंतरच्या जहागिरींचा समावेश केला. पहिल्या वर्गाच्या जहागिरी मोंगल बादशहा ब सातारकर छत्रपति यांनी दिलेल्या आहेत असे समजून त्या वंशपरंपरेने चालविल्या जाव्यात व दुस-या वर्गातील, पेशव्यांनी दिल्या असल्याने त्यापुढे जप्त केल्या जाव्यात असे ठरविले होते. वास्तविक अलपिष्टनने सर्व जहागिरांना धक्का लावण्यांत येणार नाहीं असे वचन दिले होते. पण पुढे ते वरील ठरावाने मोडण्यांत आले. याबद्दल फार गवगवा होऊ नये व जहागिरदार एकदम गरिवींत येऊ नये म्हणून अशी युक्ति केली कीं, जे जहागीरदार हयात आहेत त्यांच्या हयातीपर्यंत ती जहागीर त्यांच्याकडे तशीच्या तशीच चालेल, त्यांच्या पश्चात् त्यांच्या मुलाकडे जहागिरीच्या रकमेपैक निम्मे रक्कम रोख पोलिटिकल पेनशन म्हणून देण्यांत येईल आणि मुलाचे हयातीनंतर हे पेनशन अजीबात बंद करण्यांत येईल. ही घटना वाचकांच्या स्पष्टपणे लक्षांत येण्यासाठी त्या वेळी झालेला सरकारचा ठराव पुढे देत आहों. तो फार विस्तृत आहे. त्यांतील पहिल्या तेरा कलमांत, जहागिरी नव्या कोणत्या.व जुन्या कोणत्या यांतील भेद दाखवून त्या पुढे कोणत्या त-हेने चालवाव्या याचा ऊहापोह केलेला आहे. शेवटील आठ कलमांमध्ये कांहीं जहागिरदारांनी केलेल्या तक्रारींचा उल्लेख करून त्यांचा त्यांत निकाल हि दिलेला आहे, या शेवटच्या आठ कलमांत पानसे घराण्याचा संबध नसल्यामुळे फक्त पाहली तेरा कलमें दिली आहेत ( परिशिष्ट क्रमांक २९ पहा ). वर उल्लेखिलेल्या ठरावास अनुसरून माधवरावांच्या पश्चात् इंग्रजांनी कृष्णरावाकडे त्यांच्या हयातीपर्यंत ते सरंजाम चालू ठेविला व त्यांच्या मागे हा सरंजाम इ. सन १७५१ च्या नंतरचा आहे असे ठरवून, वर सांगितलेल्या ठरावाप्रमाणे निम्मे केला, आणि गोपाळराव व गजानराव यांच्या मृत्यूनंतर तो अजिबात च बंद केला. कृष्णाजी माधवराव हे ता. १२ नोवेंबर १८४८ सालीं वारले. पानसे घराण्यांत, प्रत्येक भावाकडे किती सरंजाम होता व तो सालोसाल कसा वाढत गेला हे दाखविणारी एक यादी आम्हांस आढळली आहे. बहुधा इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर ज्या वेळी पानशांचा सरंजाम खालसा केला; त्यावेळी ही यादी आपल्या तक्रारी अर्जास जोडण्यासाठी तयार केली असावी. यादीवरून असे दिसते