पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ पानसे घराण्याचा इतिहास. पत्र लिहिले, परंतु दामोदरराव हे वेळेवर इकडे येऊ शकले नाहीत. गणपतराव अत्यवस्थ झालेले पाहून उमाबाईंनी दुसरा दत्तक घेण्याविषयी त्यांस विनंति केली, पण ती त्यांनी साफ अमान्य करून प्राण सोडिला. गणपतरावांचे पश्चात् त्यांच्या घरी मोठी चोरी झाली. त्या चोरांत बराच ऐवज गेला. शिवाय उमाबाईने बच्याच मौल्यवान् जिनसा आपले माहेरी ( शिवापूरचे देशपांडे ) नेऊन ठेविल्या. पुढे दामोदरराव हे इकडे परत आल्यावर त्यांना ही सर्व हकीकत समजली. शिवाय उमाबाई असे म्हणू लागल्या की, तू परगोत्री असून तुझे दत्तविधान सशास्त्र झाले नाही म्हणून तुझी या इष्टेटीवर मुळीं च मालकी नाही. तेव्हां दामोदररावांनीं एजंट व गव्हर्नर -इन-कौन्सिल मुंबई यांच्याकडे फिर्याद केली. त्यांनी चौकशी करून ता. २८ सप्टेंबर १८२७ रोजी निकाल दिला व त्यांत दामोदररावांचे दत्तविधान शाबीत ठरविले. यावर उमाबाईने अपील केले, त्याचा हि निकाल ता. ११ मे १८३१ रोजी दामोदररावासारखा झाला. या तंट्यांत दामोदररावांच्या बहुतेक इष्टेटीची वाताहत झाली. या दाव्याचे वेळीं असिस्टंट पोलिटिकल एजंट याने घरांतील जंगम जिनगीची जप्ती केली. त्यावेळी पंचांचे मते त्याची किंमत ७७१७०८१०४३ रुपये झाली. या जप्तीच्या यादीत देवांच्या व माणसांच्या अंगावरील जे दागदागीने नमूद केले आहेत ते बरेच मूल्यवान् असून विविध प्रकारचे आहेत. त्यांची नांवे सुद्धा सांप्रत आपल्याला नवीं वाटतील. गणपतीपुढील उंदीर, गोपालकृष्णाखालील शेष हे हियांचे खडे बसवून नकशीकाम केलेले होते असे यादीत नमूद आहे. यावरून त्यांच्या संपत्तीची एकंदर कल्पना होईल. ४९ आषाढ वद्य पंचमीस यशवंतराव सखाराम पानसे हे मृत्यु पावले. तेव्हा त्यांची स्त्री यमुनाबाई यांनी भाऊबंदांपैकी एक मुलगा दत्तक घेऊन त्याचे नांव वामनराव असें ठेविलें. * यशवंतराव यांचे नांव सरदार पटांत दुस-या क्लासामध्ये दाखल होते व त्यास दरसाल पोषाख मिळत असे. नंतर हा मान त्यांची स्त्री यमुनाबाई यांस मिळाला. यमुनाबाईच्या पश्चात् त्यांचे दत्तक पुत्र वामनराव यांस हा मान मिळाला. परंतु त्यांचे हयाती.. अखेर पोषाख बंद झाला व पुढे त्यांचे चिरंजीव यशवंतराव यांचे नांव सरदार पटांत दाखल झाले. । कृष्णराव माधव हे शके १७७० मध्ये कार्तिक वद्य द्वितीयेस वारले. तेव्हां त्याज. कडील सरंजाम इंग्रजसरकाराने जप्त करून त्याच्या निम्मे आकाराचे पेनशन कृष्णरावांचे वडल पुत्र गोपाळरावबापू व धाकटे गजाननराव यांना नेमून दिले. कृष्णरावाकडे १०४१० रु. सरंजाम चालत होता असा दाखला आढळतो. त्याऐवजी गोपाळराव यांना ४०३८११८१ रुपये व गजाननरावास २०० रु. व त्यांची मातोश्री दुर्गाबाई यांना १२० रु. याप्रमाणे वाटणी करण्यांत आली. या बायांच्या पश्चात् त्यांच्याकडे