पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवें । शके १७४७ च्या सुमारास गणपतराव विश्वासराव पानसे वारले. त्यांस संतति नसल्याने त्यांनी आपल्या मेहुणीचा मुलगा दामोदर यास दतक घेतलें. दामोदरराव यांच्या जनक वाडिलांचे नांव गोविंदराव असून आडनांव उडपी धारवाडकर असे होते. या दत्तकाच्या परवानगीसंबंधानें गणपतराव यांनी सरकारांत एक अर्ज गुदरला, त्याचा सारांश पुढीलप्रमाणे होताः| ** राजश्री गोविंदराव उडपी हे आमचे साडू. त्यांची स्त्री व आमची स्त्री उभयता सख्या बहिणी. यांचा पुत्र पांच महिन्यांचा आमचे स्त्रीने ( ओटींत ) घेतला. याचे कारण आम्हांस संतति होत होती, परंतु ती नष्ट होई; म्हणेन पुत्र घ्यावा असे म्हणणे स्त्रीपाशी आमचे जहालें. त्यावरून तिने हा पुत्र शके १७२४ दुंदुभि नाम संवत्सरे साली आणून, पुत्रत्व करून आम्हीं स्वगोत्राने जातकर्मादि संस्कार केले. नंतर व्रतबंध जहाला. चार शिष्ट ब्राह्मण व भाऊबंद होते, ते समयीं कोणाचे मते ( दत्त ) विधान करावे, कोणाचे मते दान प्रतिग्रह जाला, संस्कार जहाले. आतां विधानाची ज़रूरी नाही असे होते. उपनयनादिक आपले हातें जहाले आहे, तरी त्यापेक्षां विधान न केल्यास चिंता नाही, म्हणोन, त्या वेळेस न केले. हल्ली आमचे स्त्रीचे शरीरास समाधान नाहीं. तिचे अंतःकरणीं, विधान झाले म्हणजे यथास्थित ( होईल ), व चार ( शिष्ट ) म्हणतात, हा पुत्र पूर्वविधि करून जहाला च आहे; परंतु, विधान करावें म्हणजे उत्तम. त्यावरून अर्जी लिहिली आहे; वगैरे” याप्रमाणे अर्ज केल्यावर सरकारांतून परवानगी मिळाली. दामोदररावांच्या मुंजीचे वेळी, पुण्यातील विठ्ठलरावतात्या विंचूरकर, चिंतोपंत देशमुख, नारायणरावदादा वैद्य यांच्यासारखी प्रतिष्ठित मंडळी आली होती. त्या वेळी हि दत्तविधानाचा होमहवन वगैरे विधि झाला च पाहिजे की काय, असा प्रश्न निघाला असतां, मुलाचे सर्व जातककर्म गणपतरावभाऊंनी केले आहे सबब होमहवन करण्याची जरूरी राहिली नाही म्हणून शास्त्रार्थ निघाला. पुढे मुलाची मुंज गणपतरावांच्या मांडीवर लागली. मुंज लागल्यानंतर सरस्वतीबाई मरण पावल्या. दामोदरराव जसजसा मोठा होत चालला तसतसा उमाबाई (सावत्र आई) त्याचा द्वेष करू लागली. तो उत्तरोत्तर जास्त वाढत चालला. त्याचा परिणाम चांगला होणार नाहीं असे पाहून गणपतराव यांनी दामोदररावास रोजगारानिमित्त ग्वाल्हेरीस पाठविण्याचे ठरविले व त्याप्रमाणे शिंदे सरकारास स्वदस्तूरचे पत्र लिहिले. शिवाय पत्रांत नाणवली हा गांव पूर्वी महादजी शिंदे यांनी पानशांना इनाम करून दिला होता, पण तो दौलतराव शिंद्यांनी परत घेतला, तरी तो सोडवून द्यावा असे त्यांत लिहिले होते. दामोदरराव ग्वाल्हेरीस गेल्यावर तेथे त्यांचे चांगले स्वागत झाले व त्यांचे खर्चास शिंद्यांनी दरमहा एक हजार रुपयांची नेमणूक करून दिली. पुढे कांही दिवसांनी इकडे गणपतरावांची प्रकृति बिघडली, तेव्हां त्यांनी दामोदररावास, पाठविण्याबद्दल शिंद्यांस