पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ पानसे घराण्याचा इतिहास. * of the family of Topkhana, who left the Peshawa after the affair of Ashta and went to Jejuri. He pleaded his brother's ill-health. The family and Jagir are of. old standing" | अलपिनाष्टने पुढे म्हटले आहे की, माधवराव पानसे यास सरंजामाबद्दल ७१९३। रुपये एक पिढपिर्यंत चालू ठेवावे. या प्रमाणे त्यांनी कलकत्त्याच्या सुप्रीम गव्हर्नमेंट कडे रिपोर्ट केला होता. त्यावर फेर चौकशी होऊन ठरविलेली रक्कम कमी करून ५४८४ रुपयांची नेमणूक द्यावी असा निकाल करून तो मंजूरीसाठी विलायतेस पाठविला. हा रिपोर्ट ता. १५ आक्टोबर १८१९ रोजी केला. | वास्तविक स्वराज्य नष्ट झाले तेव्हां ( शके १७४० ) माधवराव कृष्ण यांच्याकडे दहा हजार चारशें दहा रुपयांचा सरंजाम चालत होता. कलकत्त्याच्या वरिष्ट सरकाराने साधारण त्याच्या निम्मे रक्कम मंजुर केली. पानस सरदार अखेर पर्यंत स्वामिनिष्ठ राहन श्रीमंतांच्या बाजूस चिकटून राहिल्यामुळे इंग्रजांनी त्यांचे एवढे नुकसान । केलें, मात्र वरील सरंजामी उत्पन्नाखेरीज इतर इनामी उत्पन्न जेवढे होते तेवढे करार केलें, | या सुमारास ज. वेलस्ली यानें तोफखानेवाले पानसे सरदारांच्या सरंजामाची एक तपशीलवार यादी केलेली आढळते तींत ३५८००० रु. सरंजाम दाखविला आहे. त्याचा तपशीलः-- १६२००० हुनगुंद. २१००० हलसंगी। १८००० म्हमदापूर • ३०००० मल्हारगड ४२००० मुतलाव ४५००० हिपरगे ४०००० वैराग पानगांव ३५८००० सखारामपंत पानशांच्या वंशांत त्यांच्या नातवापासून सरंजामी उत्पन्न चालले होतें.. इतलाख उत्पन्नाबद्दल कोठे उल्लेख आढळला नाही. म्हणून ती धाकटे बाजीरावसाहेब यांची देणगी होती, असे गृहित धरून इ. स. १८२२ ते १८२५ या सालच्या दरम्यान इंग्रज सरकाराने ती जप्त केली असावी. याखेरीज फक्त खाजगी मिळकत, इनाम जमिनी, गांवें, वाडे वगैरे या शाखेकडे व पानशांच्या इतर शाखांकडे चालू राहिले. व ते अद्यापपर्यंत चालत हि आहेत.