पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवें । ११५ गणपतरावाशीं जो तहनामा ठरला “ त्या तहनाम्यांतल चौथ्या कलमांत सरंजान्माचा वगैरे पेशजीप्रमाणे बंदोबस्त करून द्यावा असा करार ठरला असतां, एलफि स्टन साहेबांनी १३२१८ रुपयांची जहागीर व पेनशन करून दिले. ते आश्विन शुद्ध दशमी शके १७४७ पावेतों ( वडील विद्यमान असेपर्यंत ) चालले. पुढे तो सरंजाम व पेनशन् आमचे ( दामोदरराव यांचे ) नांवें चालवावे, परंतु ते समयीं आम्ही दौलतराव शिंदे अलिजा बहादुर यांजपाशीं होतो. पुणे मुक्कामीं मातोश्रींनी आमचा गैरवाका समजावून आपले नांवे दोन हजार रुपये दरसाल पेनशन करून घेतले. ते । हल्लीं चालत च आहे. ( मातोश्रीच्या गैरवाक्याची) चौकशी ता. २८ सप्टेंबर १८२७ रोजी होऊन इनामवृत्ति, घरवाडा आमचा आम्हांस देवविला. त्यास इनामवृत्तीचें। उत्पन्न अजमासे १००० रु. पर्यंत आहे, सबब जातीचे बंदोबस्ताविषयी अर्ज केला असतां “ विलायतेस लिहिले गेले आहे, उक्त्र आले म्हणजे बंदोबस्त करून देऊ. म्हणून स. १८२९ पासून हुकूम होत आहे " म्हणून दामोदररावांनी आपल्या कैफयतींत इंग्रज सरकाराकडे स. १८३२ मध्ये तक्रार केली आणि पेशवे सरकारांतून जो मानमरातब चालत होता त्यांत आणि कंपनी सरकारने आतां चालावलेल्या मानमरातबांत काय फरक आहे ते पुढे लिहिल्या प्रमाणे सांगितले आहे. * पेशवे सरकारांतुन । चौघडा, जरीपटका आदिकरून साहेब सलतबतची सरदारी करीत होते. कंपनी सरकारांतून ( त्या ऐवजी ) वडिलांचे जातीस सरंजाम देऊन चालविले. (पण हल्ली आम्हांस सरकारांतून सरजाम किंवा पेनशन् कांहीं एक चालत नाही. फक्त सरदार लोकांचे दुसरे प्रतींत ( नांव ) घालून दस-याचा पोषाख वडिलाप्रमाणे देतात. " या एकंदर उता-यावरून गणपतराव व त्यांचे चिरंजीव दामोदरराव यांची बरीचशी माहिती व कंपनी सरकारचे त्यांच्याशी झालेले वर्तन याचा पुष्कळसा बोध होईल, ४, इंग्रजांचें जहागिरी खालसा करण्याचे धोरण. । अष्टीच्या लढाईत गणपतराव व माधवराव पानसे यांनी बापूंना आपल्या तोफखान्याच्या मदतीने चांगले सहाय्य केले, तदनंतर माधवराव हे जेजुरीकडे परत फिरले व पुढे सोनारास आपल्या गांवीं आले. स्वैराज्य नष्ट झाल्यामुळे त्यांना इकडे राहणे बरे वाटेना, सबब ते काशीवासास गेले व तेथे शके १७४३ साली वारले. इंग्रजी अंमल राजरोसपणे सुरू झाल्यानंतर जुने जहागीरदार व सरंजामदार यांच्या जहागिरी व सरंजाम हीं पुढे चालवावी किंवा नाही याबद्दल अलछिन साहेबांच्या देखरेखीखाली इंग्रजांनीं एक चौकशी मंडळ नेभिले. त्याने पूर्वीचे दाखले पाहून कांहीं जहागिरी जप्त केल्या व कांहीं पुढे चालविण्याचे आश्वासन दिले. मात्र सरंजामदारांना स्वतःजवळ फौज बाळगण्याची मनाई केली. इतर सरदारांप्रमाणे पानसे यांची हि चौकशी झाली व अलपिष्टनानें जो निकाल दिला त्यांत पुढील सारांश अथित आहे.