पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૨૪ पानसे घराण्याचा इतिहास. करून अखेरचा निर्णय लावून घ्यावा असे ठरविले, व त्याप्रमाणे जोराची इंग्रजी सैन्यास त्यांनीं टक्कर हि दिली. परंतु दुर्दैवाने या त्यांच्या शेवटच्या प्रयत्नांत त्यांना यश आलें नाहीं. या शेवटच्या सोलापूरच्या प्रसंगाचे वर्णन प्रत्यक्ष स्वतः गणपतरावांच्या चिरंजिवांनी केले आहे ते त्यांच्या च शब्दांत पुढे देतों.

  • यापुढे श्रीमंत निघून देशावर गेले. ते समयीं सरकारचे आज्ञेने गोखले वगैरे सरदार यांजकडील पायदळ व ( पानशांचा ) तोफखाना घेऊन गणपतराव व आम्ही ( दामोदरराव ) चंदनवंदन येथे होतो. त्या तोफखान्यांपकी पांच तोफा व नवी फौज पायदळ घेऊन, जनरल मंदरोल ( मनरो ) हा कर्नाटकांतून सात पलटणे घेऊन, नबाब पोलादजंग बहादूर ( निझामाचा एक सरदार ), सात पलटणे व पोलादजंग याजकडील फौज दुल्लेखान ( याच्या हातांखालची फौज ) मदतीस घेऊन ( आमच्यावर चालून आला तेव्हां त्याची व आमची ) सोलापूर मुक्कामी लढाई झाली. त्या लढाईचे पूर्वी * सीना व भीमा मध्य देश घेऊन, फौज व तोफखान्यासुद्धा खर्चाचा बंदोबस्त करून देतों ” म्हणून इंग्रज बहादूर यांजकडील बोलणे आले होते. परंतु आपले खानदानीवर नजर देऊन लोभ न धरितां शके १७४० मध्ये ( तारीख ६ माहे मे १८१८ ) लढाईच घेतली. त्या ; लढाईत प्रथम बसते घोडीस गोळा लागून ठार पडली. तेव्हां सरदार पडले असें फौजेच्या मनांत येऊन बेहवा गर्दी जहाली. परंतु खैर होऊन, फौज पायदळ एकत्र करून इंग्रजावर चालून घेतले. तों उजवे हातास गोळीची जखम लागून बहुत जरीस येऊन दोन घटका

आराम होण्याकरितां बाजूस बसले. इंग्रज बहाद्दर यांनी तळावर चालून आल्यानंतर किल्लयांतून लढाईस सुरुवात झाली. लढाई सरंजाम वरकड बंदोबस्ताप्रमाणें । बाजूचे समसमान सबब तहाचे बोलणे उभय पक्षीं होऊन तहनामा ७८ रजब सन सलान अशर ता. १४ मे सन १८१८ इसवींत जहाला. । - पेशव्यांनी ज्या गणपतराव पानशांचा अपमान करून त्यांचेकडील तोफखाना । काढून त्यांची स्थिति पंख उपटलेल्या पक्ष्याप्रमाणे केली; त्याच गणपतरावाने संकटकाळीं आपले स्वामीचे संरक्षणार्थ धांव घेतली. यावरून त्यांची योग्यता वाचकांच्या लक्षात येईल. चहूबाजूनें आभाळ फाटले असतां व खुद्द खाविंद हि रस्ता फुटेल तिकडे पळत असतां, आपण स्वीकारलेल्या कार्यात यशाचा वाटा आपणास किती मिळेल हे ते पूर्णपणे जाणून होते. अशा प्रसंगांत असतांना हि शत्रूनी दाखविलेल्या लालूचीस न भुलता समरांगणावर गोळी लागून बेशुद्ध होऊन पडेपर्यंत ते आपले कर्तव्यकर्म करीत होते. ही कर्तव्यनिष्ठा त्यांना इह व पर लोकीं भूषविणारी झाली यांत संशय नाहीं: गणपतरावांशी इंग्रज अधिका-यांनीं जो अखेरचा तह केला तो हि न पाळतां या प्रामाणिक व थोर घराण्याची पुढे कशी वाट लाविली हे पुढील हकीकतीवरून लक्षांत येईल,