पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवे. ११३ रात्रींच्या रात्री सिंहगडास पाठवून दिल्या ( मार्गे सिंहगड इंग्रजांस दिला असे लिहिले आहे. पण कांही दिवसांनीं तो व इतर किल्ले त्यांनी मराठ्यांना परत केले होते ). पहाटे पुन्हा थोडीशी चकमक झडली. तेव्हां पानशांकडील मंडळीनें * घोड्यांच्या तोफांचे व ज्या दोन तोफा तळावर राहिल्या होत्या, त्यांचे बार काढिले. प्रातःकाळ झाल्यावर आबा पुरंदरे यांनी महंकाळी काढण्याची सल्ला दिली, तो फिरंगी याजकल तोफेचा गोळा दहा हातांवर पडला. त्यामुळे गणपतरावांचा नाइलाज झाला. मग ते, गोखले व पुरंदरे आठ तोफांसह श्रीमंतांच्या शोधासाठी बापदेव घाटाकडे निघून गेले. इकडे दर्याभवानी व महंकाळी ह्या प्रासद्ध तोफा इंग्रजांच्या हाती लागल्या. त्यांनी त्यांच्या कानांत खिळे ठोकून त्या नादुरस्त केल्या. या तोफा अशा स्थितीत बरेच दिवस याच मैदानांत होत्या व त्या तशा स्थितीत असलेल्या स्वतः डोळ्यांनी पाहिलेलीं कांहीं माणसे आज हयात आहेत. खडकीकडील बर रोड, जो होळकर पुलावरून युरोपियन बौट-क़बाकडे जाणाच्या रस्त्याशी काटकोन करून खडकी गांवाकडे वळतो, त्या रस्त्याचे एका बाजूस हल्ली ज्या दोन तोफा पुरलेल्या दिसतात त्या च या असाव्यात असे कांहींचे म्हणणे आहे. नंतर बाळाजीपंत नातूनें। दुसरे दिवशीं पुण्यावर इंग्रजांचे निशाण फडकाविलें. तेरे पितर सरग भये ! यांत नातूने महाराष्ट्रावर महदुपकार करून ठेविले ! ! ३. स्वराज्यसंरक्षणार्थ अखेरचा प्रयत्न. बापदेव घाटाकडून श्रीमंत तसेच पुढे जेजुरीस गेले. त्या ठिकाणी गोखले व गणपतराव पानसे हे त्यांना भेटले. गणपतरावावरोवर त्यांचे चिरंजीव दामोदरराव हि होते. नंतर ही सर्व मंडळी साता-यास जाऊन पुढे पंढरपुराकडे वळली. इंग्रज सेनापति त्यांचे मार्गे पाठलाग करीत होता. पंढरपुरानजीक आष्टे गांव दोन्ही सैन्यांची गांठ पडली. श्रीमंतांनीं स्वस्थ बसून रहावे, आम्ही इंग्रज सेनेशी सामना करत असे बापूनें व गणपतरावाने परोपरीने विनविले. परंतु त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं. श्रीमंत एकटे च तेथून निघाले ते नर्मदा उतरून अशीरगडाचे आश्रयास आले. तेथे ते आपण होऊन इंग्रज सेनापति मालकम साहेब याच्या स्वाधीन झाले. यानंतर त्यांनी पेनशन घेऊन अखेरपर्यंत इंग्रजांनी दिलेल्या तुकड्यावर पिंड पोषित ब्रह्मवर्तास काळ काढिला ! गणपतराव पानसे व त्यांचे चिरंजीव दामोदरराव हे दोघे अष्टयास असतां माधवराव कृष्ण हे हि तेथे येऊन त्यांना मिळाले. पानशांनीं व बापूंनी अशा वेळी पळ काढणें नामर्दपणाचे लक्षण समजून लढाईस तोंड दिले. अष्टें येथे च युद्ध करीत असतां बापूंचा अंत झाला !! पानसे हे पुढे आपले तोफखान्यानिशीं विजापुराकडे गेले. इंग्रज सेनापति त्यांचा पाठलाग करत च होता म्हणून ते सोलापूरास येऊन तेथील किल्लयाचे आश्रयाने राहिले. किल्लयांत असतांना त्यांनी इंग्रज सेनेशी दोन हात