पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवे. १११ आपली मर्जी होती तावत्काळ खेळत ठेवून शके १७४० च्या सुमारास मराठी साम्नाज्याच्या नरडीस नख दिले. गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचा खून त्र्यंबकजी डेंगळ्याने केला असें कंपनी सरकारच्या अधिका-यांनी ठरवून प्रथम त्यास आपल्या स्वाधीन करून घेतले. आणि राज्यकारभार अव्यवस्थितपणाने चालतो सबब राज्याच्या रक्षणार्थ इंग्रजानी रायगड, सिंहगड, व पुरंदर हे तीन किल्ले, श्रीमंतांकडून हमी दाखल आपले ताब्यात घेतले. एवढंच नव्हे तर, त्याच्या भरतीस छत्तीस लाखांचा स्वतंत्र प्रांत हि हातांखाली घातला. या प्रकारामुळे श्रीमंतास वाईट वाटून, गेलेला प्रांत परत मिळविण्यासाठी त्यांनी तयारी चालविली व अठ्ठावीस हजार फौज गोळा केली. फौजेचे आधिपत्य शूर सरदार बापू गोखले यांना देण्यांत आले. इंग्रजांनी हि आपली लढाईची तयारी जारीने चालविली. इंग्रजांनी पेशव्यांचे सैन्य फितुरीने आंतून पोखरून ठेविले होते व त्यांच्याकडून लांच खाल्याशिवाय पेशव्यांचे सैन्यांत राहिलेले असे सोंवळे सरदार फारच थोडे होते. ही परिस्थिति जाणूनच सरदार विंचुरकर व सरदार बारामतीकर काळे यांनी या वेळी लढाईचा प्रसंग आणणे फायद्याचे नाही म्हणून श्रीमंतांना परोपरीने विनवून सांगितलें परंतु त्याचा विलकुल उपयोग झाला नाहीं. पेशवे सरकारची लढाईची तयारी, व त्याबद्दल होणारे गुप्त बेत हे इंग्रजास, या गुप्त बेतांतच असलेल्या मुत्सद्यांकडून दररोज नेमके कळत असत. पेशव्यांकडील गुप्त बेत व खलबत आठ दिवस चालू होती. या आठ दिवसांच्या अवधीत इंग्रज अधिका-यांस आपल्या सैन्याची जमवाजमव करण्यास पुरेसा वेळ मिळाला. नगर व मुंबईहून या अवधीत त्यांनी आपली कवायती पलटणे व घोडदळ पुण्यास आणवून गारापराजवळ छावणी दिली. पेशवे सरकारांनीं निपाणकर, अक्कलकोटकर, निंबाळकर, घोरपडे, जाधव, विंचूरकर, पटवर्धन, राजे बहादूर, भोईटे, पानसे, पुरंदरे वगैरे तमाम सरदार आपापल्या पथकानिशीं जमा केले. मुख्य सेनापतित्व बापू गोखले यांचेकडेस दिले. गोखल्यांनी आपल्या सैन्याचा तळ इंग्रज सैन्यासमोरच कांहीं अंतरावर दिला. आश्विन वद्य एकादशीच्या दिवशी सकाळीं पेशव्यांचे सैन्य लकडीपुलाच्या बाजूने नदी उतरून खडकीकडे जात होते. दुपारीं श्रीमंत पवतीस जाण्याचे निमित्ताने बाहेर पडले. त्यांच्या बरोबर पांच हजार सैन्य होते. वाटेत पानशांच्या वाड्यांजवळ जरीपटक्याच्या निशाणाचा दांडा मोडला, यामुळे अपशकून होऊन सर्वांची हिंमत खचली. नंतर निशाणास नवा दांडा घालून स्वारी पुढे गेली. स्वारीबरोबर बापू गोखले, पुरंदरे व गणपतराव पानसे हे सरदार होते. पर्वतीच्या तळाशी पोचल्यावर पहिल्या पायरीवर बापू गोखले घोड्यावरून खाली उतरले व श्रीमंतांच्या पायावर डोई ठेवून विनंति केली की, मला लढाई करण्यास आज्ञा असावी. तेव्हां श्रीमंतांनी आज्ञा दिली. नंतर बाकीच्या सरदारांनीं पायांवर डोया ठेऊन श्रीमंतांचा निरोप घेतला, आणि आपआपल्या फौजेसह औंध